Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > शेतक-याचा वाली कोण.....??

शेतक-याचा वाली कोण.....??

शेतक-याचा वाली कोण.....??
X

सतत सहा सात दिवसापासून मुसळधार पाऊस होतोय......कापूस,सोयाबीन पीकात पाणी साचून पीक काळवंडलेय.....कापूस आणि सोयाबीन झाडावरच ऊगायला सुरू झालयं.....महसूल विभाग पंचनामे करायला तयार नाही....मग शेतक-यांनी पीक विमा काढलाय तो काय कामाचा....??एवढे मोठे आस्मानी संकट शेतक-यावर कोसळलयं....तरी लोकप्रतिनीधी लक्ष द्यायला तयार नाही....राज्य सरकार कोरोना....कोरोनाच करून राहीलयं....कोरोनात कोणी मेलं तर सरकारला दुःख होतयं....आणि हा जगाचा पोशिंदा हालहाल कर्जबाजारी होवून मरतोय...आत्महत्या करतोय...त्याकडे सरकारला वेळ नाही...

कोरोनासाठी मात्र वेळ आहे...महागडी बी-बियाणे,खते,औषधी वापरून,रात्रंदिवस कष्ट करून जगतोय....आणि आस्मानी संकटामुळे डोळ्यासमोर पीक वाया जाताना पहातोय.....तोंडात आलेला घास हिरावला जातोय....परिणामी शेतकरी रडकुंडीला आलाय...... अरे आस्मानी संकट आपल्या हातात नाही...पण सुलतानी सरकार फक्त बघ्याची भुमिका घेवून राजकारणाची पोळी भाजतयं....अरे जगाचा पोशिंदा नाही जगला तर....खायला पोळी पण भेटणार नाय....शेतकरी हा सर्व दुःख गिळून गप्प बसलाय बिचारा.....त्याची आर्त हाक कोणी ऐकेल का....???जगाच्या पोशिंद्याला कोणीच वाली नाही....? लोकप्रतिनीधी,महसुल अधिकारी...आता कोरोना आवरा...मरू द्या जे मरतील ते...कोणतेच नियम पाळायला तयार नाहीत...सर्व त्यांची काळजी करायला निघालेत..... अरे....शेतक-याची काळजी घ्या तरच...सर्व वाचतील........!!!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Updated : 23 Sep 2020 5:01 PM GMT
Next Story
Share it
Top