Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > एका खांजिरा ची गोष्ट!

एका खांजिरा ची गोष्ट!

एका खांजिरा ची गोष्ट!
X

लेखक. श्री. तानाजी सखाराम कांबळे.

..................................................

खांजिर !.......

या एकाच शब्दाचे नाव ऐकताच,अंगाला दरदरून घाम फुटतो.पाठीत खंजीर खुपसला,या नावाने म्हन प्रसिद्ध आहे.

हा खंजीर अर्थात धारदार शस्त्रतील चाकू सारखाच प्रकार आहे. दैनंदिन जीवनामध्ये बरोबरीच्या माणसाने पाठीत खंजीर खुपसला, दगाफटका केला या नावाने या शब्दप्रयोगाचा उपयोग मोठ्या व्यक्तींच्या,साठी केला जातो.

राजकीय व सामाजिक जीवनातील,आरोप-प्रत्यारोप मध्ये हा शब्द परवलीचा मानला जातो.असा दगाबाज खंजीर अनेकांच्या पाठीत खुपसला जातो,मात्र त्याचा घाव काळजावरती वर्मी बसतो,मने बेचिराख होतात,

वाळवंटातल्या रेतीच्या कनासारखे,असून नसल्यासारखे!

असे अनेक खंजीर,खूपसून घेतलेले,प्रेम वीर,उद्योजक व्यावसायिक, व्यापारी,राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते,शिक्षक मंडळी, आणि या सर्वांचा दुवा,जोडलेली नाती, घरातील रक्ताची नाती, या खांजिरा ला बळी पडलेली असतात.

केवळ अवघ्या वीस रुपयांमध्ये,1987 ला, सायकल चा व्यवसाय सुरू करणाऱ्या,एका उद्योजकाने,वीस हजार कोटीचा उद्योग आज घडीला,सुरू आहे.मात्र या उद्योजकाचे कुटुंब आज रस्त्यावरती आलेला आहे.उद्योग सांभाळणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापकाला दिलेल्या विशेषाधिकाराचा वापर करत त्याने, या उद्योगपतीच्या पाटीत असा काही खंजीर खुपसला,की त्याच्या राहत्या बंगल्याचा ही लिलाव एका महिन्यापूर्वी पार पडला होता.आज घडीला ते उद्योजक हयातीत नाहीत.

मात्र त्यांचे वारसदार रस्त्यावरती आलेले आहेत.

विश्वासाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या,असे अनेकजण बिनबोभाटपणे,अनेकांच्या पाठीत खंजीर खुपसत आहेत.

अशाच,एका खांजिरा ची गोष्ट!

आपल्या लेखमालेतून आपण वाचकांच्या समोर आणणार आहे.सार्वजनिक जीवनात, कौटुंबिक जीवनात,

मैत्रीच्या जीवनात राजकीय जीवनात,कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यासाठी आपलं आयुष्य दावणीला लावलेले असते,मात्र त्याच्या पदरात हा पराभव पडलेला असतो,कारण त्याच्या पाठीत खूपसलेला खंजीर हा,

वेदना हिनं भावनाशून्य झालेला असतो.

अशा अनेक क्षेत्रातील खंजीर,वरील उल्लेख केलेल्या सायकल व्यावसायिकाच्या,पाठीत खूपसलेल्या खांजिरा सारख्या,अनेकांच्या बाबतीत घडलेला आहे.

याचाच आपण वेध क्रमश या लेखमालिके द्वारे येणार आहे.

..................................................

Updated : 19 Sep 2020 12:02 PM GMT
Next Story
Share it
Top