Latest News
Home > Sports > राष्ट्रीय रँकिंग धनुर्विद्या स्पर्धेत मंजिरी अलोने ला सुवर्णपदक

राष्ट्रीय रँकिंग धनुर्विद्या स्पर्धेत मंजिरी अलोने ला सुवर्णपदक

Manjiri Alone won a gold medal in the national ranking archery competition

राष्ट्रीय रँकिंग धनुर्विद्या स्पर्धेत मंजिरी अलोने ला सुवर्णपदक
X

नांदगाव खंडेश्वर/ओम मोरे

भारतीय धनुर्विद्या संघटना व महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना यांच्या विद्यमाने अमरावती येथे जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर तिसरी एनटीपीसी राष्ट्रीय रँकिंग धनुर्विद्या स्पर्धा आयोजित केली आहे. त्यामध्ये सब जुनियर गटात रिकव्हर प्रकारात नांदगाव खंडेश्वर येथील एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमीची खेळाडू मंजिरी मनोज अलोने हिने सुवर्णपदक प्राप्त केले आहे. मुलींच्या या गटामध्ये मंजिरी अलोने हिने हरियाणाच्या तमन्ना देशवालचा पराभव करून सुवर्णपदक प्राप्त केले तसेच हरियाणाच्या भजन कौर ला कास्य पदकावर समाधान मानावे लागले याआधी सुद्धा दुसऱ्या राष्ट्रीय नामांकन स्पर्धेत ज्या जमशेदपूर येथे झाल्या त्यामध्ये मंजिरी ने सुवर्णपदक प्राप्त केले होते .या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातील पदक विजेते खेळाडू सहभागी झाले आहे. मंजिरी अलोने ही एकलव्य गुरुकुल स्कूल येथे दहाव्या वर्गात शिकत आहे खेळासोबतच शिक्षण घेऊन मंजिरी अलोने आज विविध राष्ट्रीय स्पर्धेत पदक विजेती आहे. मंजिरी आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या प्रशिक्षक अमर जाधव याच्या मार्गदर्शनात सराव करते, तिच्या हया निवड़ीबद्दल एकलव्य धनुर्विद्या अकादमीचे मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त श्री सदानंद जाधव ,भारतीय धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदुरकर,महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे,उपसंचालक श्री विजय संतान , एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमीचे पदाधिकारी, उत्तमराव मुरादे,राजेंद्र लवंगे,विलास मारोटकर, विशाल ढवळे, अनुप काकडे, उमेश परसनकर, महेंद्र मेटकर ,अनिल निकोडे, पवन जाधव, तसेच पालक वर्गांनी अभिनंदन केले.

Updated : 4 July 2022 5:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top