एक वर्षापुर्वी चोरी प्रकरणातील आरोपीचा शोध घेवून मुद्देमाल हस्तगत करा
X
पुसद येथील वसीम खान सलीम खान यांची पोलीस अधिक्षकांकडे निवेदनातून मागणी
यवतमाळ- पुसद येथील रेहान पार्क निवासी वसीम खान सलीम खान यांच्या घरी 22 ऑक्टोंबर 2019 रोजी चोरी झाली होती. आज या घटनेला एक वर्ष पुर्ण होत आहे. अद्यापपर्यंत पुसद पोलीसांना चोरट्यांना शोधण्यात यश आले नाही. या चोरी प्रकरणातील आरोपींचा शोध त्वरीत ध्यावा तसेच चोरी झालेला मुद्देमाल त्वरीत हस्तगत करण्याचे निर्देश पुसद पोलीसांना देण्याची मागणी एका निवेदनातून वसीम खान सलीम खान यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. 22 ऑक्टोंबर 2019 रोजी आत्या मरण पावल्याने वसीन खान सलीम खान परिवारसह गढीवार्डमध्ये गेले होते. रात्री जेव्हा घरी परत आले तेव्हा चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले, त्यांची याची तक्रार लगेच पुसद पोलीसांकडे केली. पोलीसांनी अज्ञात चोरटयाविरूध्द कलम 454, 380 नुसार गुन्हा दाखल करून घटनास्थळाचा पंचनामाही केला. यावेळी श्वान पथकही पाचारण करण्यात आले होते. आज या घटनेला एक वर्ष पुर्ण होत आहे, परंतु अद्याप या प्रकरणाचा तपास पुर्ण झाला नाही. पोलीस अधिक्षक यांनी या प्रकरणात लक्ष घालून पुसद पोलीसांना या प्रकरणचा तपास त्वरीत करण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी वसीम खान सलीम खान यांनी केली आहे.