Home > Crime news > मंगरुळपीर येथे बनावट कुपनद्वारे वस्तू विक्री,गुन्हा दाखल

मंगरुळपीर येथे बनावट कुपनद्वारे वस्तू विक्री,गुन्हा दाखल

मंगरुळपीर येथे बनावट कुपनद्वारे वस्तू विक्री,गुन्हा दाखल
X

फुलचंद भगत/मंगरुळपीर

बनावट विक्री करून आर्थिक ठगवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार फिर्यादी नगरसेवक अनिल गावंडे यांनी पोलिसांत तक्रार दिली की,आरोपी रामदिन नायक व सतीश नायक रा अकोला नाका वाशीम यांनी फिर्यादिस बनावट कुपनद्वारे आमिष दाखवून निकृष्ट दर्जाची वस्तू विकून ठगवणूक केली.तसेच आर्थिक व मानसिक त्रास दिला.अशा तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम ४१५,४६४,४६८,६८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांचेकडून अंदाजे तीस हजार रुपयांच्या वस्तू जप्त केल्या आहेत. या प्रकरणाचा तपास एपीआय तुषार जाधव करीत आहेत.

फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 17 Oct 2020 4:51 PM GMT
Next Story
Share it
Top