Home > Politics > नागरिकांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घ्या- बाळासाहेब मांगुळकर

नागरिकांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घ्या- बाळासाहेब मांगुळकर

Take an aggressive stance on citizens' issues - Balasaheb Mangulkar

यवतमाळ- काँग्रेसची आक्रमकता अलीकडे कमी झाली आहे. व्हाटस अपच्या काळात फोटोवर आंदोलन सुरु आहे. फोटो काढून अपलोड केले की प्रश्‍न सुटत नाहीत. नागरिकांच्या प्रश्‍नावर काँग्रेस कार्येकर्त्यांनी आक्रमक भुमीका घेणे गरजेचे आहे. असे मत काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांनी व्यक्त केले. ते रविवार, दि. ७ ऑगस्टला सेलीब्रेशन हॉल येथे आयोजीत काँग्रेस कार्येकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी आमदार कीर्तीबाबू गांधी, माजी आमदार विजया धोटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वंदना आवारी, राजीव गांधी पंचायत राज संघटनचे प्रदेशाध्यक्ष संजय ठाकरे, प्रवक्ते प्रा. प्रविण देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष मनिष पाटील, जावेद अन्सारी, चंद्रशेखर चौधरी, भाई अमन, स्वाती येंडे, समिना शेख, कौस्तुभ शिर्के यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलतांना बाळासाहेब मांगुळकर म्हणाले की, शेतकरी, शेतमजुरांसोबत नागरिकांचे अनेक प्रश्‍न आहे. ते सोडविण्यासाठी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. आपल्या प्रश्‍नावर कुणी तरी लढतो आहे, ही चळवळ, आंदोलन नागरिकांना दिसायला हवे. काँग्रेसची आक्रमकता अलीकडे कमी झाली आहे. व्हाटस अपच्या काळात फोटोवर आंदोलन सुरु आहे. फोटो काढून अपलोड केले की प्रश्‍न सुटत नाहीत. नागरिकांच्या प्रश्‍नावर काँग्रेस कार्येकर्त्यांनी आक्रमक भुमीका घेणे गरजेचे आहे. काँग्रेसने सुरु केलेले आंदोलन चळवळ व्हायला हवी अशा पद्धतीने आता काम करणे गरजेचे असल्याचेही मांगुळकर म्हणाले. शहरातील प्रत्येक प्रभागात काँग्रेस आहे. काँग्रेसला मानणारे नागरिक आहे. आपणच त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात कमी पडत असल्याची खंत बाळासाहेब मांगुळकर यांनी बोलून दाखविली. पक्षाला उभारी देण्यासाठी पक्षबांधणी करावी लागणार आहे. आपण लोकापर्यंत गेले पाहिजे असेही मांगुळकर म्हणाले. त्यानंतर प्रवक्ते प्रा. प्रविण देशमुख म्हणाले की, या देशाला वाचवयच असेल तर काँग्रेस जिवंत पाहिजे, काँग्रेसची मूळे जिवंत ठेवणे महत्त्वाचे आहे. पडझड कितीही झाली तरी रस्तावर उतरून लढायला पाहिजे, असेही ते म्हणाले. माजी आमदार विजया धोटे म्हणाल्या की, गाव गावात जाऊन काँग्रेस पुन्हा वढवणे गरजेचे आहे, काँग्रेसने खुप काही या देशाला दिले. अनेक योजना आणल्या, माहिलना ५० टक्के आरक्षण दिले. एवढेच नव्हे तर देशाला गती देण्याचे काम काँग्रेसने केले. त्यानंतर काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा वंदना आवारी म्हणाल्या की, महागाई, बेरोजगारी वाढत आहे, खोटी आश्वासन देऊन मोदी सरकार सत्तेवर आले. काँग्रेसच्या काळात एवढी महागाई नव्हती, तेवढी महागाई मोदी सरकारच्या काळात आहे, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान राजीव गांधी पंचायत राज संघटनचे प्रदेशाध्यक्ष संजय ठाकरे यांच्यासह काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठांनी या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शहरातील काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्यासह यवतमाळ विधानसभा मतदार संघातील शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Updated : 8 Aug 2022 2:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top