Home > Politics > मोदी हटाओ, देश बचाओ च्या ना-यांनी शिवनी दणाणले

मोदी हटाओ, देश बचाओ च्या ना-यांनी शिवनी दणाणले

कॉग्रेसच्या आझादी गौरव आणि दुष्काळ यात्रेला उत्साहात प्रारंभ

मोदी हटाओ, देश बचाओ च्या ना-यांनी शिवनी दणाणले
X

प्रतिनिधी यवतमाळ

महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी आयोजित आझादी गौरव आणि दुष्काळ यात्रेला दिनांक 9 ऑगष्ट रोजी शिवनी येथे प्रारंभ करण्यात आला. प्रदेश कॉग्रेसचे चिटणीस जावेद अन्सारी तसेच तालुका कॉग्रेसचे अध्यक्ष शैलेष इंगोले यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रध्वजाला वंदन करीत यात्रा प्रारंभ करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित कार्यकर्ते व गावक-यांनी मोदी हटाओ, देश बचाओ च्या ना-यांनी शिवनी दणाणून सोडले.


कॉग्रेसच्या वतीने संपुर्ण जिल्हाभर आझादी गौरव आणि दुष्काळ यात्रा काढली जात आहे. आज घाटंजी तालुक्यातील शिवणी येथे हनुमान मंदीर परीसरात राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन तसेच स्वातंत्र सेनानी बिरसा मुंडा, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला हारार्पण करुन यात्रेला सुरुवात करण्यात आली. या मध्ये मोठया संख्येत कॉग्रेस कार्यकर्ते तसेच गावकरी सहभागी झाले होते. आपल्या पूर्वजांच्या त्याग आणि बलिदानातून भारत देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यासाठी काँग्रेस पक्षाने राष्ट्रव्यापी आंदोलन उभारले होते. प्रसंगी तुरुंगवास भोगला, छातीवर गोळ्या झेलून प्राणाचे बलिदान करत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वातंत्र्यानंतर देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबवलेत. त्यातील अत्यंत महत्त्वाची क्रांती म्हणजे कृषी क्रांती होय. डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पासून तर वसंतराव नाईकांपर्यंत अनेक नेत्यांनी कृषी विकासाला चालना दिली. ज्यांचा स्वातंत्र्य चळवळीशी, शेती-मातीशी आणि विकास कामाशी कवडीचाही संबंध नाही अशा भाजपाच्या भूलथापांना बळी पडून आपण त्यांना सत्तेवर बसविले, त्याचा दुष्परिणाम असा झाला की, शेतकरी मरणयातना भोगत देशोधडीला लागल्याची प्रतिक्रिया कॉग्रेसचे जावेद अन्सारी यांनी व्यक्त केली. महागाई, बेरोजगारी तसेच पेट्रोल, गॅस, डिझेल यांच्या दरवाढीमुळे शेतीला लागणारे बी-बियाणे, खते, किटनाशके व शेती अवजारे अत्यंत महागडे झाले आहेत तर निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे वाळवंट झाले आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांना संकटाच्या वेळी मदत करण्याऐवजी विरोधी पक्षाचे सरकार पाडण्यात मश्गुल आहे. अशा संकट काळात राज्यसरकारची शेतकऱ्यांप्रती कमालीची उदासिनता आणि दुसरी कडे केंद्रातील भाजप सरकारला शेतकऱ्यांच्या सुख दुःखाशी काही देणे घेणे नाही. धर्म आणि जातीच्या नावावर लोकांची दिशाभूल करून शेतकऱ्यांच्या बर्बादीचा मार्ग प्रशस्त केला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना जागृत करणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यांच्या संकटात सहभागी होऊन खऱ्या स्वातंत्रलढ्यासाठी आरपारची लढाई लढण्याची आता वेळ आली आहे अशी प्रतिक्रिया कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेष इंगोले यांनी व्यक्त केली आहे. या यात्रेचा समारोप रविवार दि. २१ ऑगस्टला घाटंजी येथे होणार आहे. त्याच दिवशी दुष्काळ परिषद आयोजित केली आहे. या परिषदेला सुद्धा सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जावेद अन्सारी, शैलेष इंगोले यांनी केले आहे. आजच्या आझादी गौरव आणि दुष्काळ यात्रेत शालीकबाबू चवरडोल, किसान कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय डंभारे, रंजीत जाधव, अमोल बेले, रामचंद्र भोयर, प्रकाश शेंडे, सावन पवार, लालसिंग अजमेरकर, डॉ.अरविंद तुरक, घनश्याम तुरक, फकीरा चव्हाण, संजय पवार, शाम राठोड, बबन राठोड, सुभाष आत्राम, बाळू जाधव, देवी राठोड, विनोद आडे, उपस्थित होते.


तालुका पिंजुन काढणार

आजपासून सुरु झालेली आझादी गौरव यात्रा दिनांक 14 ऑगष्ट पर्यन्त संपुर्ण घाटंजी तालुक्यात फिरणार आहे. या दरम्यान शेतक-यांशी संवाद साधून स्वातंत्र्य काळातील कॉग्रेसचे योगदान नागरीकांना सांगण्यात येणार आहे. केन्द्रातील भाजपा सरकारची शेतीविरोधी धोरणे आणि वाढत असलेल्या आत्महत्या याची माहिती सुध्दा शेतक-यांना सांगण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहो.

शैलेष इंगोले

कॉग्रेस तालुकाध्यक्ष, घाटंजी

Updated : 10 Aug 2022 7:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top