Latest News
Home > Politics > भावना गवळींचे उध्दव ठाकरेंना पत्र

भावना गवळींचे उध्दव ठाकरेंना पत्र

Letter to Uddhav Thackeray

भावना गवळींचे उध्दव ठाकरेंना पत्र
X

यवतमाळ- आपल्या सेवेशी नम्रपणे निवेदन करते की, सद्य:स्थितीत निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमुळे आपण व्यथित झाला आहात. पक्षापुढे अचानकपणे आलेल्या संकटामुळे आपणासमोर खूप मोठे आव्हान असल्याची मला कल्पना आहे. एक शिवसैनिक म्हणून माझ्या मनातही याची खंत आहे. शिवसैनिकांसाठी आपण निर्णय घ्यावा, असे वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. आपल्या पक्षातील मावळे आमदार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपणास एक मोठा निर्णय घेण्यासाठी विनंती करत आहेत. हे सर्व शिवसेनेचे शिलेदार प्रथमतः हाडामांसाचे शिवसैनिकच आहेत. त्यांच्या भावना समजून आपण त्यांच्यावर कुठलीही कठोर कार्यवाही न करता कठीण असला तरी शिवसेनेकरिता निर्णय घ्यावा ही विंनती करते. आता भावना गवळी यांच्या या पत्राचीही चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमांवर होत आहे.Updated : 23 Jun 2022 4:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top