Home > Politics > यवतमाळात कॉंग्रेस कमेटीचे तर्फे भाजपा, पीएम मोदी विरोधात धरणे आंदोलन

यवतमाळात कॉंग्रेस कमेटीचे तर्फे भाजपा, पीएम मोदी विरोधात धरणे आंदोलन

Dharne protest against BJP, PM Modi by Congress Committee in Yavatmal

यवतमाळात कॉंग्रेस कमेटीचे तर्फे भाजपा, पीएम मोदी विरोधात धरणे आंदोलन
X

यवतमाळ : 25/03/2023 रोजी यवतमाळ कॉंग्रेस कमेटी तर्फे खासदार राहुल गांधी यांच्यावर सूड बुद्धीने त्यांच्या लोकसभेत खासदार की चे स्द्स्त्व रद्द केले त्या विरोधात या यवतमाळ शहर कॉंग्रेसच्या वतीने यवतमाळ येथे संविधान चौकमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलनं करण्यात आले. यावेळी यवतमाळ मधील सर्व वरिष्ठ नेते पदाधिकारी सर्व आघाड्याचे पदाधिकारी सर्व नगर सेवक नगर सेविका पदाधिकारी हजर होते. महागाई, बेरोजगारी, खाजगीकरण, अदाणी प्रकरणांची चौकशी व भ्रष्टाचार इत्यादी जनसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडणारे व हे प्रश्न लाऊन धरल्यामुळे मोदी सरकारची नाचक्की होत होती. म्हणुन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांची खासदारकी रद्द करुन लोकशाही व्यवस्थेची हत्या केंद्र सरकार ने केली आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी कांग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी. जावेदभाई अन्सारी महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, अशोक बोबडे जेष्ठ नेते, चंदु चौधरी शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी यवतमाळ, उषा दिवटे महिला शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी यवतमाळ,कृष्णा पुसनाके जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया काँग्रेस कमिटी यवतमाळ, विक्की राऊत विधानसभा अध्यक्ष युवक काँग्रेस यवतमाळ, नितेश बुटले,कौस्तुभ शिर्के जिल्हाध्यक्ष एनएसयुआय विद्यार्थी काँग्रेस यवतमाळ,अजय किन्हीकर,संगिता उमरे,पल्लवी रामटेके माजी नगरसेविका यवतमाळ, जितेश नावडे, ,पप्पू मुडलवार,माजी आरोग्य सभापती नंदू भाऊ कुडुमते सुनील भाऊ बोरकर, अजय मैत्रेकर, अनिल चौरे ,दत्ता हाडके, डॉक्टर संदीप तेलगोटे ,लाला तेलगोटे, पंडित कांबळे,संजय वाळके कपिल गजभिये,बंडु जाधव,सनी आगळे, अजय चौपाने, संगित काळे, कैलास सुलभेवार, मोहसीन खान, दर्शना इंगोले,लांजेवार सर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.










Updated : 25 March 2023 10:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top