काँग्रेसने केला दलित उमेदवाराचा गेम
Congress played the game of Dalit candidate
X
काँग्रेसने केला दलित उमेदवाराचा गेम
मुंबई : विधानपरिषदेच्या पार पडलेल्या निवडणूकीत भाजपने पुन्हा एकदा राज्यसभेच्या निवडणूकीतील जलवा दाखवत आपला उमेदवार निवडूण आणला आहे. तर या विजयात भागेदारी कोण ? भाजपला कोणी मतदान केलं? तर या निवडणूकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आपला उमेदवार निवडूण आणण्यासाठी प्रयत्न केले मात्र काँग्रेसमध्ये प्रयत्न होताना दिसले नाहीत. असेच काहीशी ओरड आता काँग्रेसच्या गोटात होताना दिसत आहे. निवडणूकीचा निकाल हाती आल्यानंतर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. तसेच त्यांनी काँग्रेसचा दलित उमेदवार हा पराभूत झाला हे दुर्दैवी असल्याचे म्हटलं आहे.
दरम्यान विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार निवडून आले आहेत. याचे कारण आधीच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. ते म्हणाले होते की, महाविकास आघाडीत प्रचंड नाराजी आहे. सरकारवर त्यांच्याच आमदारांचा विश्वास नाही. त्यामुळे आमचा पाचवा उमेदवार हा निवडणू येईल. आणि झाले ही तसेच. या विधान परिषदेत शेवटच्या क्षणी भाजपचे प्रसाद लाड चांगल्या मतांनी विजयी झाले. तर काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांना पराभव पत्कारावा लागला. तर या निवडणुकीत आघाडीची 21 मतं फुटल्याचे समोर आले.तर हे फक्त महाविकास आघाडीतला अंतर्गत रोष बाहेर पडल्याचेच दर्शवणारे होते. त्यामुळे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ट्विट करत आपली खदखद मांडली. ते म्हणाले, दलित उमेदवार चंद्रकांत हंडोरे ज्यांना काँग्रेस आमदारांच्या पहिल्या पसंतीची मते मिळायची होती. ते काँग्रेस पक्षाच्या दुसऱ्या पसंतीच्या उमेदवाराकडून पराभूत झाले हे खरोखरच दुर्दैवी आहे. ही अंतर्गत दुफळी आहे.
दरम्यान पराभवानंतर चंद्रकांत हंडोरे यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रीया देण्यास नकार दिला.
दरम्यान या निवडणुकीत शिवसेनेचे सचिन अहिर, हामशा पडवी हे उमेदवार विजयी झाले. तर राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे नाईक निंबळकर आणि एकनाथ खडसेही दणक्यात विजयी झाले. तसेच भाजपणे आपली रणनिती आखल्या प्रमाणे राम शिंदे, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांचा विजय झाला.