जुन्या पेंशनच्या मागणीसाठी आग्रही रहा,मी तुमच्या सोबत आहे-पदवीधर आमदार धिरजभाऊ लिंगाडे .
Be persistent in your demand for old pension, I am with you Graduate MLA Dhirajbhau Lingade.
X
कारंजा- दिनांक 14 मार्च पासुन मध्यवर्ती कर्मचारी संघटना,शासकीय व निमशासकीय कर्मचारी,समन्वय समिती आणि विविध संघटनानी पुकारलेल्या बेमुदत संपात राज्य सरकारी कर्मचारी व विविध संघटनेचे, विविध विभागाचे कर्मचारी पाचव्या दिवशी कारंजा तहसील कार्यालय परिसर येथे जुन्या पेंशनच्या मागणी करीता आयोजित संपात 392 कर्मचारी ऊस्फुर्तपणे सहभागी झालेत.त्यामुळे सलग पाचव्या दिवशी सकाळी 10:30 ते 3:00 यावेळात संप सुरु होता. बेमुदत संपाच्या पाचव्या दिवशी पदवीधर आमदार धिरजभाऊ लिंगाडे व शिक्षण संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्याच्या राज्याध्यक्षा सौ.संगीताताई शिंदे, गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांनी भेट देऊन संपकाऱ्याना मार्गदर्शन केले.
संपाच्या सुरुवातीला शिक्षण संघर्ष संघटनेच्या राज्याध्यक्ष सौ.संगीताताई शिंदे यांनी मार्गदर्शन केले पेंशनची लढाई गेल्या 12 वर्षापासून मी करत आहे आता आपण यशाजवळ आलो आहे?सर्व संघटित रहा व संघर्ष करा.मी शेवटच्या श्वासा पर्यन्त तुमच्या सोबत आहे.त्यानंतर पायदळ मोर्च्याला सुरुवात झाली.मोर्चा तहसिल कार्यालयातून सुरु झाला,पुढे जयस्तंभ चौक,भगतसिंग चौक, शिवाजी महाराज चौक, गाडगे महाराज चौक, महात्मा फुले चौक, रामासावजी चौक,जिजामाता चौक,पोहा वेस,जानता राजा चौक,डॉ. बाबासाहेब आम्बेडकर चौक मार्गे तहसील कार्यालय येथे पायदळ मोर्च्याची सांगता झाली.यादरम्यान मोर्च्याच्या मार्गातील महापुरुषांच्या पुतळयाला हारार्पन करन्यात आले.मोर्च्याच्या दरम्यान 'एकच मिशन जूनी पेंशन, पेंशन मागणारे कोन हाय शेतकऱ्यांचे पोर हाय...' अशाप्रकारच्या घोषणा देण्यात आल्यात.
समारोपिय कार्यक्रमात पदवीधर आमदार धिरजभाऊ लिंगाडे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की,आपला संप हा रास्त मागणी साठी आहे, पेंशन हा आपला हक्क आहे,तो मिळवन्यासाठी तुम्ही संप सुरु ठेवा, मी तुमच्या सोबत आहे.मी सभागृहात तुमचा मुद्दा लावून धरतो.
असे संपकर्याना मार्गदर्शन केल्यामुळे उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.जुन्या पेंशनची मागणी पूर्ण होई पर्यन्त बेमुदत संप सुरुच राहिल अशी संपकरी मंडळीने प्रतिक्रिया दिली आहे.सदर संपाला जिल्हातून वाशिम जिल्हा शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय इढोळे,उपाध्यक्ष विजय मनवर,संचालक प्रशांत वाझुळकर ,सौ.संध्याताई बांडे, राजूभाऊ मते,स्वीकृत सदस्य पुरुषोत्तम तायडे, आदर्श बहुजन शिक्षक संघटने चे महेंद्र खडसे,शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप देशमुख, मंगरुळपिरचे निलेश मिसाळ,मनीष गावंडे सामाजिक समता प्रबोधन मंचचे हंसराज शेंडे,श्रीकृष्ण बोळे,विनायक पदमगिरवार, राजाभाऊ डोनगावकर,दिलीप भोजराज, प्रदिप वानखडे, संजय कडोळे आदि व अनेक मान्यवरांनी भेटी दिल्यात. सदर मोर्च्यात आलेल्या कर्मचारी बांधवांचे महाराष्ट्र राज्य जुनी पपेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश कानडे यांनी आभार मानले. संचलन नंदकिशोर भोयर यांनी केले तर संपूर्ण मोर्चाचे उत्कृष्ठपणें नियोजन विजय भड व कारंजा तालुका पेन्शन समन्वय समितीच्या शिलेदारांनी केले. याप्रसंगी अनेक समजसेवी लोकांनी,वाशिम जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थानी बिस्कीट व पाण्याची मोर्चेकरी करिता व्यवस्था केली होती. असे वृत्त विजय भड सर यांनी महाराष्ट् राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना कळवीले .