Home > Politics > काँग्रेसच्या वतीने शेलुबाजार ते मंगरुळपीर पर्यंत 'आझादी का गौरव पदयात्रा'

काँग्रेसच्या वतीने शेलुबाजार ते मंगरुळपीर पर्यंत 'आझादी का गौरव पदयात्रा'

'Azadi Ka Gaurav Padayatra' from Shelubazar to Mangrulpir by Congress

काँग्रेसच्या वतीने शेलुबाजार ते मंगरुळपीर पर्यंत आझादी का गौरव पदयात्रा
X

फुलचंद भगत

वाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथून मंगरुळपीर पर्यंत ता. ९ ऑगस्ट रोजी काँग्रेसच्या वतीने आझादी का गौरव पदयात्रा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ अमित झनक यांच्या नेतृत्वात काढण्यात आली.


देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली असून या स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसचे योगदान अमूल्य आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काँग्रेसतर्फे ९ ऑगस्ट क्रांती दिनापासून राज्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या संकल्पनेतून 'आझादी का गौरव पदयात्रा' काढण्यात येत असल्याचे यावेळी आ अमित झनक यांनी सांगितले. या पदयात्रेत तालूका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष मिलिंद पाकधने,प्रदेश प्रतिनिधी एड प्रकाश इंगोले,माजी जि प सदस्य दिलीप मोहनावाले,अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष जावेद सौदागर,उबेद मिर्झा,सैय्यद आझम,सुनील मिसाळ,गोपाल सावके,सागर म्हैसणे, सिद्धार्थ सावद,अ सादिक,रज्जाक, आदिंची उपस्थिती होती.

Updated : 9 Aug 2022 7:01 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top