Home > Crime news > खरबडा येथील " पंजा सवारीचे " साहित्य चोरट्याला अटक, पाटण पोलिसांची धडक कारवाही, 24 तासांत आरोपीला अटक.

खरबडा येथील " पंजा सवारीचे " साहित्य चोरट्याला अटक, पाटण पोलिसांची धडक कारवाही, 24 तासांत आरोपीला अटक.

खरबडा येथील  पंजा सवारीचे  साहित्य चोरट्याला अटक, पाटण पोलिसांची धडक कारवाही, 24 तासांत आरोपीला अटक.
X

म मराठी न्यूज टीम

प्रतिनिधी :- पुरुषोत्तम गेडाम,

यवतमाळ /झरी (जामणी).

तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खरबडा येथील "पंजा सवारीच्या" बंगल्यातून संशयित चोरट्याने साहित्य चोरले. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. पोलिसांनी अवघ्या 24 तासांत मुद्देमालासह आरोपीस अटक केली.

12 ऑक्टोबर रोजी खरबडा येथून 4 किमी पूर्वेस असलेल्या शेतात सवारीचा बांगला आहे. आरोपीने बंगल्याची माहिती घेतली . शेख नुरू शेख मुस्तफा यांस मी सवारी घेऊन जातो असे पांढरकवडा येथील सलिम खान यासिन खान मणियार व राहुल कुनघाटकर रा. पांढरकवडा असे बोलले. नंतर निघून गेले.

दुसऱ्या दिवशी गावातील जब्बार नामक व्यक्तीची पत्नी ही शेतात आली. सवारीचे दर्शन घेण्याकरिता गेली असता सवारीची पेटी उघडी दिसली. महिलेला चोरी झाल्याची शंका आली. गावात जाऊन विकास हनमंतु सोपरवार यांनी जाऊन तपासणी केली.

तेव्हा पितळी पंजा किंमत 20,000 व 1 kg चांदीचा चंदनहार किंमत 40,000 ऐकून रक्कम 60 हजारांचा मुद्देमाल चोरी झाल्याचे आढळले. सवारीचे साहित्य चोरी जाताच खरबडा गावातील पुरुष,महिला मोठ्या संख्येने पोलिस स्टेनला धडकलेत. चोरीचे साहित्य व आरोपीना त्वरित अटक करा अशी मागणी केली. ठाणेदार अमोल बारापात्रे यांनी आश्वासन दिल्यानंतर गावकरी परत गेले.

एक दिवसापूर्वी सलीम खान यासीम खान मणियार व राहुल कुनघटकर आले होते. सवारीचे दर्शन घेतो व सवारी घेऊन जातो असे बोलले होते. त्यावरून दोघांवर संशय आला. संशयितांविरोधात विलास हणमंतू सोपरवार रा. खरबडा यांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी यावरून भा.द.वी.कलम 380, 34 नुसार गुन्हा दाखल केला.

जिल्हा पोलिस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासला सुरुवात करून गत 24 तासांच्या आत आरोपी राहुल कुनघटकर याला अटक केली व संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला. संपूर्ण कार्यवाही ठाणेदार अमोल बारापात्रे यांसह पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे, जमादार श्यामसुंदर रायके, संदीप सोप्याम ,अंजुश वाकडे, अंकुश दरबसतेवार, शेख इरफान व आकाश नांनुरवार यांनी केली.

प्रतिनिधी :- पुरुषोत्तम गेडाम,

मो.9763808163.

Updated : 16 Oct 2020 7:37 PM GMT
Next Story
Share it
Top