Home > News > आज यवतमाळात रंगणार "मैफिल यारो की"

आज यवतमाळात रंगणार "मैफिल यारो की"

मिञ वणव्यामध्ये गारव्या सारखा फेम प्रा.अनंत राऊत यांची प्रमुख उपस्थिती

आज यवतमाळात रंगणार मैफिल यारो की
X

यवतमाळ/ प्रतिनिधी

दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा या कवितेसह अनेक कवितांमुळे प्रसिध्दीच्या शिखरावर असलेले अकोला येथील कवी प्रा. डॉ. अनंत राऊत हे गुरुवार दि. २६ रोजी यवतमाळात येणारं आहे. मिञ - मैत्रिणीच्या आठवणींना आणि आपल्या आयुष्यातील मित्रांच्या उपकाराला समर्पक असा "मैफील यारो की" हा कार्यक्रम डॉ. निरज वाघमारे यांनी आयोजीत केला आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षक कवी - गझलकार अनंत राऊत ह्या माध्यमातुन मैत्री ह्या विषयावर गझल व कवितांचे सादरीकरण करणार आहे. शहरातील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातील श्रोतृगृहात दुपारी १२.०० वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कवी राऊत मैत्री या विषयावर बोलताना ते काव्य मैफिलही रंगवणार आहेत. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, ही अनंत राऊत यांची गजल सोशल मीडियावर प्रचंड गाजली. अप्रतिम आवाज आणि दमदार सादरीकरण यामुळे आपली वेगळी ओळख अनंत राऊत यांची आहे.

धकाधकीचा आणि धावपळीच्या जीवनात एकमेकांपासून दूर असलेले किंवा वैयक्तिक आयुष्यात व्यस्त असलेल्या मित्रांच्या आठवणींना घेऊन "मैफिल यारो की" हा कार्यक्रम डॉ. निरज वाघमारे यांनी आयोजित केला आहे. काव्य रसिकांसह यवतमाळकराना प्रजासत्ताक दिनी ही खास पर्वणी असणार आहे.सदर कार्यक्रमाचा प्रवेश हा निःशुल्क व खुला असणार आहे. त्यामुळे सर्व मिञ मैत्रिणी ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजक डॉ. निरज वाघमारे यांनी केले आहे.

Updated : 25 Jan 2023 7:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top