Home > News > यवतमाळ येथे 'वॉक फॉर संविधान'

यवतमाळ येथे 'वॉक फॉर संविधान'

विविध सामाजिक संघटनांचा सहभाग

यवतमाळ येथे वॉक फॉर संविधान
X

यवतमाळ : आज २६ नोव्हेंबर...! प्रत्येक भारत वासीयांच्या अस्मितेचे प्रतिक असलेल्या भारतीय संविधानाबद्दल कृतज्ञता, अभिमान व सन्मान व्यक्त करण्याचा सोनेरी दिवस..! या देशातील प्रत्येक नागरिकांस न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता बहाल करून मूलभूत हक्क, कर्तव्ये व अधिकार याद्वारे मोकळा श्वास घेता येतो आहे.संविधानाला काळजातून अग्रस्थानी मानणाऱ्या वर्गाकडून संविधान जागराचे विविध कार्यक्रम देशाच्या कानकोपऱ्यात अलीकडच्या काही वर्षांमध्ये घेतले जात आहेत. नागवंशीयांची भूमी असलेल्या नागपूर च्या धर्तीवर मागील पाच सात वर्षांपासून वॉक फॉर संविधान (Walk For Sanvidhan) हा उपक्रम नित्यनेमाने राबविल्या जातो आहे.२००५ मध्ये माजी सनदी अधिकारी इ. झेड खोब्रागडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतांना संविधान प्रास्ताविक वाचनाचा 'संविधान ओळख' व २६ नोव्हेंबर 'संविधान दिन' उपक्रम सुरु केला. पुढे संपूर्ण महाराष्ट्रभर हा उपक्रम सुरु झाला. आतां देशभर विविध पातळीवर संविधान दिनाचे कार्यक्रम घेतले जातात.

याच अनुषंगाने आज यवतमाळ येथे संविधान दिनी "वॉक फॉर संविधान" रॅलीचे आयोजन केलेले आहे.सदर वॉकथॉन संविधान चौक बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर प्रास्ताविकेचे वाचन करून मुन्सिपल हायस्कुल, पोस्ट ऑफिस चौक, एल आय सि चौक ते शिवतीर्थ यानुसार मार्गक्रमण करणार आहे. सदर वॉक फॉर संविधान रॅलीमध्ये संविधानावर अपार निष्ठा असणाऱ्या कास्ट्राईब कर्मचारी महासंघ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कृती समिती,समता पर्व प्रतिष्ठान,स्मृती पर्व,महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संगठन यवतमाळ,समता सैनिक दल,बानाई यवतमाळ,ऑफिसर्स फोरम यवतमाळ,प्रजासत्ताक शिक्षक व शिक्षकेत्तर संघ,भीम टायगर सेना,रमाबाई आंबेडकर जयंती समिती, यवतमाळ,ऑल इंडिया पॅन्थर सेना , यवतमाळ,सेवा निवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी असोसीएशन,शामादादा ब्रिगेड

अनेक सामाजिक संघटनांचा सहभाग असणार आहे. या वॉकथॉन मध्ये शहरातील शासकीय, निमशासकीय अधिकारी,कर्मचारी शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी व जेष्ठ नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गाईड चव्हाण,सिद्धार्थ भवरे,हरीश रामटेके,ऍड सचिन आठवले,प्रफुल शंभरकर व समस्त टीमद्वारे करण्यात आले आहे.

Updated : 2022-11-25T15:10:33+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top