Home > News > आज अमरावतीत भव्य रोजगार आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या : श्याम प्रजापती यांची माहिती

आज अमरावतीत भव्य रोजगार आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या : श्याम प्रजापती यांची माहिती

Today in Amravati grand employment movement stopped at the collector office: information of Shyam Prajapati

आज अमरावतीत भव्य रोजगार आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या : श्याम प्रजापती यांची माहिती
X

बुलडाणा - पदवीधरांच्या विविध मागण्यांना घेऊन येत्या 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रोजगार आंदोलन होणार आहे. ज्या माध्यमातून पदवीधरांच्या भल्यासाठी शासन काय करत आहे याबाबतचा जाब विचारला जाणार आहे, जास्तीज जास्त तरूणाईने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन श्याम जगमोहन प्रजापती यांनी संयुक्त रोजगार आंदोलन समितीच्या माध्यमातून केले आहे.

26 नोव्हेंबर रोजी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणाऱ्या रोजगार आंदोलनासंदर्भात माहिती देताना श्याम प्रजापती यांनी सांगितले की, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम बुलडाणा या पाचही जिल्ह्यातील पदवीधरांच्या उज्वल भविष्याकरिता सर्वांनी या लढ्यात सहभागी होण्याची आवश्यकता आहे. प्रस्तापीत राज्यकर्त्यांनी नेहमीच पदवीधरांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे. आज पदवीदऱ विविध प्रकारच्या समस्यांना तोंड देत आहे. मात्र मस्तवाल आमदार सत्तेच्या मस्तीत येऊन तल्लीन झालेले आहेत. ते पदवीधरांच्या समस्या सोडविण्याचे सोडून त्यांच्यावर पोलिसांच्या माध्यमातून दबाव टाकत आहेत. ही बाब निषेधार्य आहे. म्हणून याविरूद्ध आवाज उठविण्यासाठी, शासनाला रोजगार मागण्यासाठी 26 नोव्हेंबर रोजी संयुक्त रोजगार आंदोलन समितीच्या माध्यमातून आंदोलन होत आहे. यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्याम प्रजापती यांनी केले आहे. 60 लाख पदे त्वरीत भरणे, बेरोजगारी भत्ता देणे, राष्ट्रीय रोजगार निती कायदा पास करणे, ठेका पद्धती बंद करणे, बेरोजगारांना उद्योग उभारण्यासाठी सर्वकष मदत करणे इत्यादी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून रेटून धरल्या जाणार असल्याचेही प्रजापती यांनी सांगितले.

Updated : 25 Nov 2022 1:16 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top