Home > News > शौचास गेलेल्या कामगारांवर वाघाचा हल्ला, ब्राह्मणी परिसरातील घटना

शौचास गेलेल्या कामगारांवर वाघाचा हल्ला, ब्राह्मणी परिसरातील घटना

जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

शौचास गेलेल्या कामगारांवर वाघाचा हल्ला,    ब्राह्मणी परिसरातील घटना
X

वणी : शौचास गेलेल्या एका कामगार तरुणावर वाघाने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याला वणी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटना आज गुरुवारी पहाटे ४ वाजताच्या दरम्यान तालुक्यातील निळापूर (ब्राह्मणी) येथे घडली आहे.

उमेश पासवान (३५)रा.बिहार असे जखमी कामगाराचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार निळापूर परिसरात हायटेंशन विद्युत वाहिनीचे काम सुरु आहे. इथे अनेक परप्रातिंय मजूर काम करतात. काही मजूर गावालगत शेतात झोपडी बांधून कुटुंबासह राहतात. आज पहाटे ४ वाजताच्या दरम्यान उमेश पासवान शौचास जाण्यासाठी शेतात गेला. दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर अचानक हल्ला केला. वाघाने उमेशच्या मानेवर व गळ्यावर पंज्याने वार केले त्यात तो गंभीर झाला. वाघाने हल्ला करताच उमेशने आरडा ओरड केला. त्यामुळे परिसरातील लोक धावून आले. लोकांना पाहून वाघाने तिथून धूम ठोकली. घटनास्थळी उमेश गंभीर रित्या जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला तात्काळ वणी येथील लोढा हॉस्पिलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहे.

Updated : 24 Nov 2022 12:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top