Latest News
Home > News > कळाशी येथील वाघाडी प्रकल्प चौकशी च्या जाळ्यात.

कळाशी येथील वाघाडी प्रकल्प चौकशी च्या जाळ्यात.

करोडो रुपयांचा घोटाळा बाहेर, अभिषेक गावंडे यांचे प्रयत्न ..

कळाशी येथील वाघाडी प्रकल्प चौकशी च्या जाळ्यात.
X

कळाशी येथील वाघाडी प्रकल्प चौकशी च्या जाळ्यात.


करोडो रुपयांचा घोटाळा बाहेर, अभिषेक गावंडे यांचे प्रयत्न ..

दर्यापूर तालुक्यातील कळाशी हे गांव आणि गांव जवळच असलेला वाघडी प्रकल्प सध्या चर्चेचा विषय बनला आहे. निर्माणाधिन असलेल्या वाघाडी प्रकल्पाचे जवळपास 98% पुर्ण झालेले काम अत्यंत निक्रुष्ठ दर्जाचे असल्याचे झालेल्या चौकशीत निष्पन्न झाले असून प्रकल्पाच्या बांधकामात झालेला करोडोंचा भ्रष्टाचार सर्व दूर उघडकीस आला आहे. वाघाडी प्रकल्पात चालत आलेला भ्रष्टाचार आता जनते समोर आलेला असुन अधिकारी व ठेकेदाराच्या मुसक्या आवळून त्यांच्या हातात बेळ्या पडणार असल्याचे गावकऱ्यांनी भाकीत केले आहे.हा संपूर्ण प्रकार गावातील समाज सेवक प्रकल्पग्रस्त व ग्रामपंचायत सदस्य अभिषेक गावंडे यांनी उघडकीस आणला असुन अनेकांनीअभिषेकचे कौतुक करत पाठ थोपटली आहे. अभिषेक गावंडे हे ग्रा.पं सदस्य या नात्याने .होत असलेल्या धरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले असता अत्यंत निकृष्ठ दर्जाचे काम होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी अनेक वेळा त्या संदर्भात संबंधितांना तक्रारी केल्यात परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही.परंतु गावंडे यांनी आपला पाठपुरावा सतत चालू ठेवत एक जाग्रुत नागरिक म्हणून त्यांनी धरणाच्या निक्रुष्ठ बांधकामामुळे भविष्यात होणारी जीवित व वित्त हानी लक्षात घेता भविष्यातील ही हानी टाळता यावी व अघटित काही होऊ नये म्हणून त्यांनी सदर प्रकरणाची रितसर लेखी माहिती निवेदना व्दारे अखेर मा.ना.जलसंपदा राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांना दिली बच्चुभाऊ यांनीं प्रकरण गांभीर्याने घेत चौकशी साठी अधिकाऱ्यांची नेमणूक करून चौकशी करण्याचे व धरणाच्या कामाचे परीक्षण करण्याचे आदेश दिले होते. या चौकशी दरम्यान असे लक्षात आले की वाघाडी प्रकल्पाचे काम हे अत्यंत निकृष्ठ दर्जाचे आहे असे आढळून आले. व वाघाडी प्रकल्पात झालेला करोडो रुपयांचा घोटाळा उघडकीस आला. चौकशी व परिक्षणा दरम्यान स्पष्ट दिसून आले की काँक्रीट ची मजबुती जी आवश्यक होती ती नव्हती. वाघाडी प्रकल्पात वापरण्यात आलेले सामान हे अत्यंत निकृष्ठ दर्जाचे होते असे चौकशी अहवालात दिसुन आले असुन संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड झाला. आहे.

वाघाडी प्रकल्पा मध्ये दोषी असणारे अधिकारी व ठेकेदारांवर संबंधित सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे शासन स्तरावरुन सांगण्यात आल्याचे अभिषेक गावंडे यांनी सांगितले असुन .आधिच गावऱ्यांची शेकडो एक्कर जमीन प्रकल्पाच्या कामासाठी अत्यंत कवडीमोल भावात सरळ खरेदीने घेवुन देशोधडीला लावले असताना प्रकल्पग्रस्तांना जिवाने सुध्दा मारण्याचा प्रण शासन/ प्रशासनाने घेतला आहे का? असा संशयात्मक प्रश्न निर्माण झाला असल्याचे विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समीतीचे अध्यक्ष मा.मनोजभाऊ चव्हाण यांनी म्हटले आहे. अभिषेक गावंडे यांनी घेतलेल्या योग्य वेळी योग्य पावलांमुळे भविष्यात होणारे मोठे अघटित संकट टाळता आले या साठी सर्वत्र अभिषेकर कौतुकाचा वर्षाव होत असुन यामुळे ईतर प्रकल्पांवर सुध्दा प्रेरणा मिळाली असुन अनेक प्रकल्पांवरिल भ्रष्टाचार निश्चितच उघडकीस येईल असे विदर्भ बळीराजा संघर्ष समीतीचे केन्द्रीय कार्यकारणी सदस्य विकासभाऊ राणे यांनी म्हटले आहे.


या धरणाचे काम हे चौकशी दरम्यान खूप जास्त प्रमाणात निकृष्ट आढळलेले आहे, या मुळे गावाला भविष्यात जीवित व वित्त हानी होण्याचा धोका नाकारता येणार नाही.

गावाच्या हितासाठी लवकरच पुढचे पाऊण उचलू...


अभिषेक पंजाबराव गावंडे

ग्रामपंचायत सदस्य कळाशी


Updated : 23 Jun 2022 9:28 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top