Home > News > सोनार सेवा महासंघाची बैठक संपन्न

सोनार सेवा महासंघाची बैठक संपन्न

The meeting of Sonar Services Federation was concluded

सोनार सेवा महासंघाची बैठक संपन्न
X

यवतमाळ

येथील सर्व शाखीय सोनार समाज बांधवांची संयुक्त बैठक २१ नोव्हेंबर रोजी स्थानिक संत नरहरी महाराज मंदिरात संपन्न झाली. बैठकीला सोनार सेवा महासंघ आणि विविध संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. सोनार समाजाचे दैवत संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रम नियोजन विषयी चर्चा करण्यात आली. पुण्यतिथीचे दिवशी महाराजांच्या मंदिरासमोर सभागृहाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सोनार समाजाचे आराध्य दैवत श्री आशापुरी देवी संस्थान नजरपुर उज्जैन मध्यप्रदेश येथे दिनांक २९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमास सहपरिवार जाण्याचे ठरले. महासंघाच्यावतीने आगामी २०२३ सालाचे कॅलेंडर प्रकाशित करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. दिनदर्शिकेचे विमोचन माता आशापुरी देवी मंदिर पावनभुमी नजरपुर, उज्जैन मध्य प्रदेश येथे करण्याचे ठरविण्यात आले.

पदवीधर निवडणुकीसाठी सोनार महासंघाचे अभी.ॲड. अरुण सगळे यानां संधी मिळाल्यास त्याच्यां करिता समस्त सोनार समाजातील पदविधर मतदार बाधवांनी आपले नाव या यादीत नोंदणी करण्यासाठी प्रत्येक परिवारातील पदवीधर सदस्यांचे फॉर्म भरण्याचेही या बैठकीत सांगण्यात आले.

Updated : 24 Nov 2022 2:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top