Home > News > सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ दिवेकर यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ दिवेकर यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

Social activist Siddharth Diwekar was awarded the Bharat Ratna. He was honored with Babasaheb Ambedkar Samajbhushan Award

सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ दिवेकर यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
X

राजेश ढोले पुसद तालुका प्रतिनिधी

आज(दिनांक 19 मार्च) 2023 रोजी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकरराव लोमटे (आंबेडकरी साहित्य विचारवंत उमरखेड) हे होते.

तर स्वागत अध्यक्ष प्रा.सुनील खाडे (साहित्यीक,पुसद), उद्घाटक म्हणून प्रकाश झळके (उपविभाग सांभा, उमरखेड) हे होते.

तर प्रमुख पाहुणे म्हणून निवड समिती अध्यक्ष तातेराव हनवते, उपाध्यक्ष एम.डी कोकणे, सिद्धार्थ दिवेकर पत्रकार कुमार केंद्रेकर हे होते.

सिद्धार्थ दिवेकर यांच्या बद्दल सामाजिक माहिती मागील 15 वर्षा पासून उमरखेड शहरामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करत असणारे व भिम टायगर सेना या सामाजिक संघटना मध्ये शहराध्यक्ष या पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपले नाव उज्वल करणारे, अन्याय अत्याचाराच्या विरोधात अनेक आंदोलने,उपोषणे, मोर्चे काढणारे आणि उमरखेड शहरामध्ये बसवण्यात आलेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती नवीन पुतळ्यासाठी अथांग परिश्रम घेतले असून नवीन पुतळा कसा आणता येईल याबद्दल समाज जागृती करत समाज एकत्र आणण्याचे महत्वपूर्ण काम यांनी केले आहे.

म्हणून सिद्धार्थ दिवेकर निर्भिड पत्रकार म्हणून काम करणारे तथा सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ दिवेकर यांना सामाजिक कार्यकर्ते तथा आयोजक भैय्यासाहेब पाईकराव, तातेराव हनवते, एम. डी कोकने, मूनेश्वर सर यांच्या हस्ते राज्यस्तरीय समाजभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देऊन "प्रशस्तिपत्र" सन्मानित करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्रातील अनेक व्यक्तींचा सामाजिक कार्याबद्दल त्यांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आली आहे.

चौकट:- धम्म सेवक भैय्यासाहेब पाईकराव यांनी माझ्या सामाजिक कार्याची दखल घेतल्यामुळे मी त्यांचे व त्यांच्या संस्थेचे आभार व धन्यवाद मानतो. आणि मी मागील अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहून अनेकांना न्याय देण्याचे काम केले आहे. खरोखरच आज माझ्या कार्याचे कौतुक या संस्थेने करून मला सन्मानित करण्यात आले.

यावेळी उमरखेड तालुक्यातील अनेक बौद्ध उपासिका, उपासक, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Updated : 19 March 2023 4:41 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top