Home > News > शिवसेना ठाकरे गटाच्या भव्य हिंदुत्व रॅलीने लक्ष वेधले

शिवसेना ठाकरे गटाच्या भव्य हिंदुत्व रॅलीने लक्ष वेधले

Shiv Sena Thackeray faction's grand Hindutva rally drew attention

शिवसेना ठाकरे गटाच्या भव्य हिंदुत्व रॅलीने लक्ष वेधले
X

जन-संग्राम/यवतमाळ

येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही हिंदुह्ृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शहरातून भव्य हिंदुत्व रॅली काढण्यात आली. या भव्यदिव्य रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. संपूर्ण महाराष्ट्रात निघणारी शिवसैनिकांची ही एकमेव हिंदुत्व रॅली आहे. शिवसेनेतील संघटित शक्ती, शिस्त याचे सर्व समाजाला दर्शन व्हावे, त्यातून प्रबोधन घडावे यासाठी हिंदुत्व रॅली काढण्यात येते. या रॅलीची सुरुवात येथील रंगोली ग्राउंड येथून करण्यात आली. त्यानंतर विविध मार्गाने मार्गक्रमण करत घोषणा व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयजयकाराने शहर दुमदुमुन गेले होते.


सर्वप्रथम पदाधिकारी व शिवसैनिकांकडून हिंदुह्ृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन मानवंदना देण्यात आली. शिवसेना ही एकच आणि ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात चालत आलेली लहानश्या गावातील लहानशा माणसा पासून ते मोठ्या मानसाची असल्याचे माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी सांगितले. प्रत्येक शिवसैनिक हा शिवाजी महाराजांच्या मावळ्यासारखा आहे व तानाजी मालुसरे, शिवा काशिद, येसाजी कंक यांच्याप्रमाणे काम करणारा आहे असे वक्तव्य महंत सुनील महाराज यांनी केले. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना कटिबद्ध आहे, शिवसेनेचे हिंदुत्व हे खरे हिंदुत्व आहे, रिकाम्या हाताला काम देणे आणि डोळ्यातील अश्रुंना आनंदाश्रुंमध्ये परावृत्त करणारे आमचे हिंदुत्व आहे अशा शब्दात हिंदुत्वाची व्याख्या जिल्हाप्रमुख संतोष ढवळे यांनी शिवसैनिकांना स्पष्ट करून दिली. तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरें हे आपल्यासाठी एकमेव पक्षप्रमुख आहेत न्यायालयाच्या निर्णयाचे आपल्याला काहीही घेऊन देणे नाही असे कडवट वक्तव्य जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केले. तसेच माजी मंत्री संजय देशमुख, जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे, माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार आणि पिठाधीश महंत सुनील महाराजांनी शिवसैनिकांमध्ये उत्साह भरून देणारे भाषण केले. त्यानंतर प्रसिद्ध व्याख्याते सोपानराव कनेरकर यांनी शिवसैनिकांचे आपल्या व्याख्यानातून प्रबोधन केले. यानंतर रंगोली ग्राउंड येथून भव्य अशी हिंदुत्व रॅली काढण्यात आली. हजारो शिवसैनिक पांढरा गणवेश, आणि भगवा शेला या पेहरावात हिंदुत्व रॅलीत हिंदुत्वाचे नारे देत सहभागी झाले. ही रॅली रंगोली ग्राउंड ते यवतमाळ येथील शिवतीर्थापर्यंत काढण्यात आली होती. यावेळी माजी मंत्री संजय देशमुख, जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, जिल्हाप्रमुख संतोष ढवळे, जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे, जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर, माजी आमदार तथा जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब मुनगिनवार, संजय देरकर, उपजिल्हाप्रमुख गजानन डोमाळे, उपजिल्हाप्रमुख किशोर इंगळे, तालुकाप्रमुख संजय रंगे, गजानन पाटील, चेतन शिरसाठ, स्रेहल भाकरे, नितीन माकोडे, दिगंबर मसके, राजेश जवळकर, गजानन पांडे महिला आघाडीच्या सागरताई पुरी, लताताई चंदेल, कल्पना दरवई तसेच सर्व महिला पदाधिकारी आणि युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपुर्ण रॅली आणि सभेचे संचालन निवासी उपजिल्हाप्रमुख प्रविण पांडे यांनी केले.Updated : 24 Jan 2023 11:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top