Home > News > राज्यस्तरीय इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनाकरीता वाशिम जिल्ह्यतून 08 विद्यार्थ्यांची निवड

राज्यस्तरीय इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनाकरीता वाशिम जिल्ह्यतून 08 विद्यार्थ्यांची निवड

Selection of 08 students from Washim District for State Level Inspire Award Exhibition

राज्यस्तरीय इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनाकरीता वाशिम जिल्ह्यतून 08 विद्यार्थ्यांची निवड
X

कारंजा-विज्ञान व तंत्रज्ञान भारत सरकार व राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान भारत यांचे विद्यमाने राज्यस्तरीय इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनाचे जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीयस्तरीय व नवप्रर्वतन उत्सव दिल्ली अश्या टप्पात आयोजन करण्यात येते. महाराष्ट्रात नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र शासनाची राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रविनगर, नागपूर ही कार्यान्वीत करते.

शालेय मुलांमध्ये सुजनशिल आणि रचनात्मक विचाराणी संस्कृती करण्यासोबतच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक गरजांना पूर्ण करण्यांच्या दुष्टीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. ही स्टार्टअप इंडीयाच्या प्रसाराकरीता एक महत्वपूर्ण सहभागीता ठरत आहे. सत्र 2021-22 करीता जिल्हयातून एकूण 1051 इतक नामांकने नोंदविण्यात आली होती. त्यापैकी 79 विद्यार्थ्याचे जिल्हास्तरीय इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनाकरीता निवड करण्यात आली होती,परंतु त्यापैकी 73 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रकल्प सादर केलेत. 10 टक्केच्या नियमानुसार खालील 08 विद्यार्थ्यांचे निवड राज्यस्तरीय प्रदर्शनाकरीता करण्यात आलेली आहे.

राज्यस्तरीय इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनाकरीता 08 विद्यार्थ्यांची निवड प्राप्त यादीत प. पू. नारायण महाराज ज्ञानमंदिर भिलखेडा, कारंजाच्या ऋषिकेश अशोक शिंदे याचा स्मार्ट एअर बॅग फॉर हार्वेस्टेड क्रॉप इन रेनी सीजन हा प्रकल्प,सोहेल करामत खान याचा एनर्जी जनरेशन बाय 'ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम ऑन रोड हा प्रकल्प, गौरी अजय नेमाने हिचा ऑटोमेटिक वेट गार्बेज डस्टबिन हा प्रकल्प, श्री. धानोरकर आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धानोरा तालुका मंगरूळपीरचा कुणाल हेमंत सारसकर याचा टू प्रिव्हेंट एअर पॉल्युशन ऑफ फॅक्टरी स्मोक हा प्रकल्प,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साखरा तालुका जिल्हा वाशिमच्या गायत्री गजानन धनुडे हिचा मॉडिफाइड स्प्रेड फॉर एग्रीकल्चर युज हा प्रकल्प,श्री.बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय यावर्डी तालुका कारंजाचा यश शंकरराव मांगे याचा कंपरटेबल हॉस्पिटल बेड हा प्रकल्प,मुलीबाई चरखा प्राथमिक इंग्लिश शाळा वाशिमच्या आरती विनोद वाझुळकर हिचा पायजो इलेक्ट्रिक पॉवर जनरेटर हा प्रकल्प,ब्लुचिप कॉन्वेंट कारंजाच्या सायली सतीश उगले हिचा मल्टीपर्पज लंच बॉक्स विथ हैंड वाशिंग अलार्म हा प्रकल्पाचा समावेश आहे.

सदर ऑनलाइन प्रदर्शनीचे परिक्षन स्वामी विवेकानद कनिष्ठ महाविद्यालय, कोकलगावचे उच्च माध्यमिक शिक्षक नवनाथ बाबा कदम, विद्याभारती इंगलिश मीडियम स्कूल & जु.कॉलेज कारंजाचे उच्च माध्यमिक शिक्षक साद खान सलिम खान व राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान भारतचे विनयकुमार यांनी जि.प. वाशिमचे (माध्यमिक) शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे,जिल्हा समन्वयक विजय भड यांचे मार्गदर्शनात यशस्वीरित्या पूर्ण केले असल्याचे वृत्त पत्रकार संजय कडोळे यांचेकडून मिळाले आहे .

Updated : 25 Jan 2023 10:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top