Home > News > रावण दहन प्रथा बंद करावी;मंगरुळपीर येथील आदिवासी बांधवांची मागणी

रावण दहन प्रथा बंद करावी;मंगरुळपीर येथील आदिवासी बांधवांची मागणी

Ravana Dahan practice should be stopped; demand of tribal brothers of Mangrulpir

रावण दहन प्रथा बंद करावी;मंगरुळपीर येथील आदिवासी बांधवांची मागणी
X

(फुलचंद भगत)

वाशिम:-रावण दहन प्रथा बंद करावी अशी मागणी मंगरुळपीर तालुक्यातील आदिवाशी बांधवांनी केली असुन तशा आशयाचे लेखी निवेदन पोलीस प्रशासनासह सर्व सबंधित विभागांना दिले आहे.

न्यायप्रिय राजा म्हणून ख्याती असलेल्या रावण यांचे दसर्‍याच्या दिवशी मंगरुळपीर आणी तर्‍हाळा येथील यात्रेत दहन करतात, भावना दुखवणारी ही दहन प्रथा तात्काळ बंद करण्या बाबत निवेदन आदिवाशी बांधवांनी सादर केले आहे.न्यायप्रिय महात्मा राजा रावण अत्यंत समृद्ध संस्कृतीच्या वैभवशाली वारसाचा देदिप्यमान अविस्मरणीय ठेवा आहे व विविध गुणांचा समुच्चय आहे राजा रावण महान दार्शनिक, संगीत तज्ज्ञ, राजनीतिक, शिल्पकार, आयुर्वेदाचार्य, विवेकवादी उत्कृष्ट नगर रचनाकार, समताधिष्ठित, समाजव्यवस्थेच्या उदगाता, साहित्यिक, न्याय प्रिय राजा अशा अनेक गुणांचा आविष्कार करणारा महान राजा होता. राजा रावण हा मूलनिवासी आदिवासी समुदायाच्या महासम्राट होता. हजारो वर्षापासून मूलनिवासी आदिवासी त्याची पूजा करतात, त्याला आपला महानायक शूरवीर योद्धा महाज्ञानी बलाढ्य शक्तीसाली विद्वान, अनेक शास्त्रांचा अभ्यासक व शंभुचा पुजारी मानतात आजही रावण पूजा मेघनाथ पूजा करतात. तामिळनाडूमध्ये रावणाची ३५२ मंदिरे आहेत सर्वात मोठी मूर्ती मध्यप्रदेशात मंदसौर येथे अंदाजे १५ मीटर उंचीची आहे छत्तीसगढ़, मध्यप्रदेश, झारखंड आणि महाराष्ट्रातही अमरावती जिल्ह्यात मेळघाटसह सर्वत्र राज्यभर राजा रावणाची पूजा केली जाते. अकोला जिल्ह्यात पातूर तालूक्यातील सांगोला गावात राजा रावणाची मूर्ती असून पूजा केली जाते.आदिवाशी समाजातील व इतरही समाजातील संशोधक,साहित्यिक यांनी रावणाचा खरा इतिहास शोधुन काढला व जगासमोर मांडला आहे.रावण हे आदिम संस्कृतिचे श्रध्दास्थान व दैवत आहे आणी योध्दा व महासम्राट होता.परंतु १९३० पासुन त्याला जाळतात.त्यांच्याबद्दलचा राग,व्देष,मत्सर त्याला अपमानित,ऊपरोधिक नावाने संबोधुन काही ठिकाणी जाळतात.त्यामुळे आदिवाशि समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात व येणार्‍या पिढिमध्येही व्देष मत्सराची व पेटवुन देण्याची भावना कायम रुजत राहते त्यामुळे रावणाला जाळन्याची प्रथा बंद करावी अशा आशयाचे लेखी निवेदन सादर केले आहे.सदर निवेदनावर सुखदेव ढंगारे,वसंतराव भोंडणे,सुखदेव घोरसडे,जीवन हगवणे,सुभाष पवणे,दिलीप वाघमारे,मोतीराम गायकवाड आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 24 Sep 2022 1:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top