Home > News > राहुल गांधी यांनी शहीद परिवाराची आस्थेने विचारपूस केली.

राहुल गांधी यांनी शहीद परिवाराची आस्थेने विचारपूस केली.

Rahul Gandhi inquired about the family of martyrs.

राहुल गांधी यांनी शहीद परिवाराची आस्थेने विचारपूस केली.
X

राहुल गांधी यांनी शहीद परिवाराची आस्थेने विचारपूस केली.


सावळी सदोबा ( वार्ता ):- मरणोपरांत वीरता पदक विजेता शहीद ज्ञानेश्वर आडे (कृष्णनगर, ता. आर्णी) यांच्या वीरपत्नी श्रीमती कुंतीताई आडे यांनी स्व.इंदिराजी गांधी यांच्या स्मृतिदिनी दि. १९ नोव्हेंबर ला शेगाव येथे भारत जोडो यात्रेदरम्यान मा.खा. राहुलजी गांधी यांची भेट घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी शाहिदाच्या प्रतीमेला नमस्कार केला व त्यांच्या कुटुंबीयाबद्दल आस्थेने विचारपूस केली. मुलगा इंजिनिअर होत असल्याचे ऐकून राहुलजिंना आनंद झाला. 'कुछ तकलिफ है क्या' असा प्रश्न राहुलजींनी केला यावर 'सब ठीक है' असे उत्तर दिल्यावर कुछ प्रॉब्लेम हो तो मुझे इमेल करना असे राहुलजी यांनी आवर्जून सांगितले. या भेटीने शहीद परिवार समाधानी असून या भेटीकरिता सहकार्य केल्याबद्दल माजी मंत्री मा.शिवाजीराव मोघे, मा.खा.बाळूभाऊ धानोरकर, माजी नगराध्यक्ष मा.आरीज बेग मिर्झा यांना धन्यवाद देत आहे.

Updated : 25 Nov 2022 4:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top