Home > News > 'पीएम स्वनिधी' ठरली पांढराहत्ती

'पीएम स्वनिधी' ठरली पांढराहत्ती

घाटंजी स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून नियमांची पायमल्ली

पीएम स्वनिधी ठरली पांढराहत्ती
X

'पीएम स्वनिधी' ठरली पांढराहत्ती

घाटंजी स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून नियमांची पायमल्ली

महेश पवार यांची पंतप्रधान, मुख्यमंत्र्याकडे तक्रार

कोरोनाविषाणू साथीच्या रोगाने अनेक व्यक्तींच्या जीवनावर, विशेषत: शारीरिक श्रमात गुंतलेल्यांच्या जीवनावर परिणाम केला आहे. यामधे फेरीवाले, छोटे व्यावसायिक प्रामुख्याने आहेत. लॉकडाऊनमुळे रस्त्यावरील विक्रेत्यांचे व्यवसाय बंद झाले आहेत किंवा कमीत कमी चालू आहेत अशा फेरीवाल्यांसाठी पिएम् स्वनिधी योजना सुरू केली. मात्र स्थानिक स्टेट बँक शाखा घाटंजी आणि महाराष्ट्र बँकेने या चांगल्या योजनेला हरताळ फासला आहे. गेल्या दोन महिन्यात एकही प्रकरण मंजूर केलेले नसून शेकडो लाभार्थ्यांना यापासून वंचित ठेवले आहे त्यामुळे शाखा व्यवस्थापक आणि संबंधित कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी घाटंजी येथील आंदोलक महेश पवार आणि लाभार्थ्यांनी केली आहे.


ही योजना केंद्र सरकारने २ जुलै २०२० पासून ५० लाखांहून अधिक पथ विक्रेत्यांसाठी सुरू केली आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालया ही योजना राबवित आहे. पीएम स्वानिधीची योजनेअंतर्गत विक्रेत्यांना कर्जाची रक्कम त्यांच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज म्हणून १०,००० रुपये दिले जातात आणि हा कर्ज परतफेडीचा कालावधी अर्जदारांना कर्जाची रक्कम १ वर्षाच्या कालावधीत मासिक हप्त्यांमध्ये भरावी लागते.

केंद्र सरकारने उद्दात हेतूने ही योजना सुरू केली. मात्र बँक कर्मचारी हे कर्ज प्रकरण करत असताना वेगवेगळी कारणे देतात. लाभार्थ्यासोबत संबंधित कर्मचारी उर्मट पणाने बोलतात. बघू करूची भाषा वापरतात. संबंधित कर्मचारी तर एक महिना सुट्टीवर होता, तर आता ऑडिट सुरू आहे असली कारणे शाखा व्यवस्थापक देत आहे. एकंदरीतच त्यांच्या वागण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. केंद्र सरकारने गरीब लोकांसाठी जी योजना सुरू केली त्यांच्या विरोधात हे बँक कर्मचारी आपली भूमिका वटवीत आहे. यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे असे निवेदन सामाजिक कार्यकर्ते महेश पवार यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, संबंधित बँक प्रमुखांना दिले आहे.


यावेळी महेश पवार, अंकुश ठाकरे, दत्ता घोडे, राम खांडरे, विवेक घोडे, मुकेश चीव्हाने, शिरीष गिरी, अविनाश पडवे, नागोराव गिणगुले, गोलू नगरीया, सुभाष गाजबे, विष्णू शिंदे, सय्यद सद्दाम, सादिक पठाण, निर्मला राठोड, नाझी खान, प्रवीण भोंग, अमोल चौरागडे, दादाराव गीनगुले, शेख अश्पाक, शंकर जुनघरे, विठ्ठल शिंगेवार, सतीश अंबाघरे, विनोद धांदे, महम्मद पठाण, शेख इमरान, अमोल शिंगेवार, जुबेर मिया, सय्यद साजीद, सोहेल खान, समीर शेख, रवींद्र चीव्हाणे, राज पांडे इत्यादी उपस्थित होते.

Updated : 25 Jan 2023 8:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top