चित्रकला स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न
Painting competition successfully concluded
X
"परीक्षा जवळ आलेल्या आहेत. अभ्यासाच्या व्यापामुळे विद्यार्थी तणावाखाली असतात. अशावेळी त्यांचा वरील तणाव कमी होण्यासाठी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभर भारतीय जनता पार्टी चर्चा हा कार्यक्रम राबविला जात आहे. त्याअंतर्गत आज भव्य चित्रकला स्पर्धा माश्री आमदार मदनभाऊ येरावारव भजपा जिल्हा अध्यक्ष श्री नितीनभाऊ भुतडा यांच्या मार्गदर्शनात व राजूभाऊ पडगीलवार जिल्हा संघटन महामंत्री, शहर अध्यक्ष श्री प्रशांत भाऊ यादव पाटील, युवा मोर्च्या जिल्हा अध्यक्ष श्री आकाशभाऊ धुरट प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी सौ रेखाताई कोटेकर महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ मायाताई शेरे यांच्या उपस्तिथी मध्ये घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव देत भारत देशाच्या इतिहासात अजरामर झालेल्या थोर पुरुषांसोबतच भारत देश विश्वविजेता बनत असल्याचे अतिशय सुंदर चित्रांचे रेखाटन केले. या वेळी सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा नेते माजी मंत्री माननीय आमदार मदनभाऊ येरावार यांनी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. सदर स्पर्धा ही दिनांक 22 जानेवारी 2023 रोजी स्थानिक स्वातंत्र विर सावरकर मैदान याठिकाणी इयत्ता नववी ते बारावी च्या विद्यार्थी विद्यार्थिनी करिता आयोजिले असून स्पर्धा पूर्ण करण्याकरिता दीड तासाचा कालावधी देण्यात आले. या स्पर्धेत 700च्या वर विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला असून प्रथम क्रमांक अथर्व कुंडे
द्वितीय क्रमांक अजय टकाले
तृतीय क्रमांक प्रशिक बनकर आणि 35 प्रोत्सांपर पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे पंच म्हणून
प्राचार्य गौरव धवस
वाधवानी चित्रकला महाविद्यालय.
प्रवीण जीरापुरे
विवेकानंद विद्यालय.
नरेंद्र महादेवराव गौरकार अभ्यंकर कन्या शाळा.
रोशन माहुरे
सुसंस्कार विद्या मंदिर.
विक्रम ठाकरे
जायंट्स इंग्लिश मीडियम स्कूल.
महेश ठाकरे
स्कूल ऑफ स्कॉलर्स.
राजू गजलवार
जिल्हा परिषद शाळा हिवरी.
संजय भाऊ
चित्रकार या सर्वांच्या सहानुमते निकाल जाहीर करण्यात आले.
या स्पर्धेचे आयोजन युवा मोर्च्या जिल्हा महामंत्री रोहित वा. राठोड यांनी केले केले. स्पर्धेसाठी विशेष पाहुणे म्हणून विविध क्रीडा क्षेत्रातील कला क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आले ज्यामध्ये डॉ.उल्हास नंदुरकर
शिवछत्रपती पुरस्कार व दादोजी कोंडदेव पुरस्कार प्राप्त.
प्रदीप गोळे सर
उप शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ .
किशोर चौधरी सर
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ क्रीडा मार्गदर्शक आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू व मार्गदर्शक.
तिलक पुरके
नॅशनल गेम्स गुजरात सॉफ्टबॉल सुवर्णपदक प्राप्त.
आराधना गुप्ता
राष्ट्रीय कबड्डी खेळाडू, नुकत्याच झालेल्या पोलीस गेम्स राज्य स्पर्धेमध्ये वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात सिल्वर मेडल प्राप्त.
हर्षदा परांडकर
नृत्य वैभव सन्मान, इंटरनॅशनल आयकॉनिक पेजेंट विजेते 2022, राष्ट्ररत्न अवॉर्ड 2021.
राहुल ढोणे
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल पंच या स्पर्धेला विशेष सहकार्य बंटी गुप्ता जिल्हा सचिव युवा मोर्चा तर संचलनाची धुरा जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा अभिषेक श्रीवास यांनी सांभाळली यावेळी शहर महामंत्री अजय भाऊ खोंड शंतनू भाऊ शेटे माजी नगरसेवक नितीनभाऊ गिरी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शुभम सरकाळे सुरज चे सुरज विश्वकर्मा योगेश पाटील शुभम पतिंगे जिल्हा महामंत्री महिला आघाडी वैशालीताई खोंड जिल्हा उपाध्यक्ष कीर्तीताई राऊत महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पूजाताई युवा मोर्चा शहराध्यक्ष जुगल भाऊ तिवारी अश्विन बोपचे शहर महामंत्री शुभम चोरमले शहर उपाध्यक्ष विशाल बावणे तालुका अध्यक्ष युवा मोर्चा अजय धुरट महामंत्री सुरज खंडाटे किशोर सांस्कृतिक आघाडी जिल्हाध्यक्ष स्मिताताई भोईटे नंदाताई जीरापुरे सुषमाताई राऊत साधनाताई काळे रमेश फुंडकर काका आकाश ठोंबरे परीक्षित आडे सम्यक देठे राज मुजमुले ऑफिस गडवाणी. व इतर नागरिक उपस्थित होते.