Home > News > सौ. दुर्गा सुमित मुथा यांच्या 30 उपवासाचे पचक्खान संपन्न

सौ. दुर्गा सुमित मुथा यांच्या 30 उपवासाचे पचक्खान संपन्न

Mrs. Durga Sumit Mutha's 30 Fasting Pachakkhan completed

सौ. दुर्गा सुमित मुथा यांच्या 30 उपवासाचे पचक्खान संपन्न
X

यवतमाळ - पांढरकवडा येथील जैन धर्म स्थानक येथे पांढरकवडा येथील सुप्रतिष्ठीत व्यापारी सुभाष मुथा यांची पुत्र वधू सौ. दुर्गा सुमित मुथा हिने ज्ञान गच्छादीपती प्रकाश मुनीजी म. सा. यांचे सुशिष्य गुरुदेव श्री हसमुख मुनीजी म. सा. व प्राण मुनीजी म. सा. यांच्या निश्रय मध्ये दि. 22 सप्टेंबर रोजी सुराणा भवन पांढरकवडा येथे 30 उपवासाचे पचक्खान घेतले. या प्रसंगी विदर्भातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पचक्खान कार्यक्रमा प्रसंगी बोलतांना गुरुदेव हसमुख मुनीजी म. सा. म्हणाले की, तप आराधनेला जैन धर्मात महत्व असून या उपवासा दरम्यान फक्त गरम पाण्याचे सेवन करुनच तपश्‍चर्या करण्यात येते. आत्म बळामुळेच तप आराधना करणे शक्य होते. शरीर मजबुत दाडदिप्पट असल्याने तपश्‍चर्या होत नसते तर आत्म बळामुळेच तप आराधना पुर्णत्वास जाते. या प्रसंगी मासखामनची तपश्‍चर्या पुर्ण केल्याबद्दल सौ. दुर्गा सुमित मुथा यांचे अभिनंदन पत्र देऊन सन्मान करण्यात आले. या प्रसंगी मोठ्या संख्येने श्रावक श्राविका उपस्थित होते.

Updated : 23 Sep 2022 1:56 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top