Home > News > 'बाळासाहेबांची शिवसेना' पदाधिकाऱ्यांचे मातोश्री वृद्धाश्रमात मातृ-पितृ पूजन

'बाळासाहेबांची शिवसेना' पदाधिकाऱ्यांचे मातोश्री वृद्धाश्रमात मातृ-पितृ पूजन

माईंदे चौकात बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेस अभिवादन

बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मातोश्री वृद्धाश्रमात मातृ-पितृ पूजन
X

यवतमाळ - 'बाळासाहेबांची शिवसेना' पदाधिकाऱ्यांनी आज येथील निळोणा परिसरातील मातोश्री वृद्धाश्रमात मातृ-पितृ पूजन करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केली. यानिमित्त वृद्धाश्रमातील ज्येष्ठांचे औक्षवंत करून त्यांना आहेर देवून गरजेच्या वस्तू भेट दिल्या. तत्पूर्वी बाळासाहेबांची शिवसेनाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्थानिक माईंदे चौकात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.


वृद्धाश्रमातील ज्येष्ठ वृद्धांचे पाय धुवून त्यांना महिलांना साडीचोळी आणि पुरुषांना शर्ट, पैजामा आहेर करून त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले. यावेळी यवतमाळ शहरातील कर्तृत्ववान आईंची विशेष सत्कार करण्यात आला. या आईंचाही पाय धुवून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला बाळासाहेबांची शिवसेनाचे संपर्कप्रमुख हरिहर लिंगनवार, जिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड, माजी जिल्हा प्रमुख पराग पिंगळे सहसंपर्कप्रमुख गोपाळ पाटील, महिला आघाडी जिल्हाप्रमुख माधुरी अराठे, युवा सेना जिल्हाप्रमुख विशाल गणात्रा, युवती सेना जिल्हाप्रमुख निमिषा पोघट, तालुकाप्रमुख योगेश वर्मा, तालुका संघटक अरुण वाकडे, गजानन इंगोले, पुरुषोत्तम राठोड, पुरुषोत्तम टिचकुले, महेश पवार आदींसह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.Updated : 24 Jan 2023 8:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top