Home > News > देशातील अराजकता बघून चुप राहणे अपराध ठरले असते- लीलाताई चितळे

देशातील अराजकता बघून चुप राहणे अपराध ठरले असते- लीलाताई चितळे

भारत जोडो यात्रेत स्वातंत्र्य लढ्याच्या जागविल्या आठवणी

देशातील अराजकता बघून चुप राहणे अपराध ठरले असते- लीलाताई चितळे
X

प्रतिनिधी यवतमाळ

इंग्रजांविरुध्द लढतांना महात्मा गांधी यांनी सन 1942 मध्ये "चले जाओ" चा नारा दिला. "करा किंवा मरा"चा दिलेला संदेश कानावर येताच सर्वच जाती आणि धर्माचे नागरीक स्वातंत्र्य लढयात सहभागी झाले. आज मात्र देशात जाती-धर्मातच वाद निर्माण केले जात आहे. खुलेआम संविधानाची पायमल्ली होत आहे. अशा वेळी देशातील तरुण गप्प आहे. ही दुर्भाग्यपुर्ण गोष्ट आहे. मात्र राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून सर्वांना जागरुक करण्याचा प्रयत्न केला. अशा परीस्थितीत माझ्यासारख्या स्वातंत्र्य सेनानीला चुप राहणे अपराधाचे ठरले असते, अशा भावना लीलाताई चितळे यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांच्याजवळ व्यक्त केल्या.

लीलाताई चितळे या सन 1942 मध्ये अवघ्या 12 वर्षाच्या होत्या. दिनांक 8 ऑगष्ट 1942 रोजी महात्मा गांधी यांनी इंग्रजांविरुध्द "चले जाओ"चा नारा दिला. दुस-याच दिवशी लीलाताई चितळे तसेच त्यांच्या दोन मैत्रीनींनी इंग्रजांविरुध्द घोषणाबाजी केली म्हणून त्यांना पोलिसांनी दिवसभर पोलिस स्टेशन मध्ये डांबून ठेवले. त्यांचे वडील तसेच भावाला मात्र साडेतीन वर्षाची जेल झाली. आज देशात प्रधानमंत्री नरेंन्द्र मोदी यांच्या कार्यकाळात इंग्रजांच्या कार्यकाळासारखी अराजकता माजली आहे. संविधानाची खुलेआम पायमल्ली केली जात आहे. याविरुध्द राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढल्यामुळे लीलाताई स्वताला घरात थांबवू शकल्या नाही. त्यांनी प्रदेश कॉग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना निरोप पाठवून भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याची आणि राहुल गांधी यांना आशिर्वाद देण्याची इच्छा व्यक्त केली. लीलाताईचे वय 94 वर्ष असल्यामुळे नानाभाऊंनी त्यांना प्रथम नकार दिला. मात्र लीलाताईंची जिद्द बघून अखेर नानाभाऊंनी देवानंद पवार यांचेवर भेट घडवून आनण्याची जबाबदारी सोपविली. देवानंद पवार यांनी राहुल गांधी यांची लीलाताई सोबत भेट घडवून आणली. लीलाताईंच्या भारत जोडो यात्रेतील सहभागाने उपस्थितांमध्ये प्रचंड जल्लोष संचारला. एवढेच नव्हे तर त्यांच्या सहभागाने राष्ट्रप्रेमाची भावना वृध्दींगत झाली. लीलाताईंनी राहुल गांधी यांच्याव्यतिरीक्त कॉग्रेस नेते जयराम रमेश यांचीही भेट घेऊन आपल्या या लढयात माझा शेवटच्या श्वासापर्यन्त सहभाग राहील असा विश्वास दिला.

लीलाताईंचे कार्य प्रेरणा देणारे

लीलाताई चितळे यांचे कार्य समाजाला प्रेरणा देणारे आहे. त्यांनी अवघ्या बारा वर्षाच्या असतांना इंग्रजांविरुध्द लढा पुकारला. महात्मा गांधी यांचे 1942 चे भारत छोडो आंदोलन आणि आता राहुल गांधी यांनी संविधानाच्या रक्षणासाठी सुरु केलेले भारत जोडो आंदोलन सारखेच आहे. या यात्रेत लीलाताईंनी दिलेला संदेश तरुणांमध्ये आत्मबळ वाढविणारा आहे. ही पवित्र भेट घडवून आनण्याचा मला योग आल्याचे समाधान आहे.

देवानंद पवार

प्रदेश सरचिटनीस, कॉग्रेस

Updated : 25 Nov 2022 9:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top