Home > News > लिंगायत समाजाचा आंतरराज्यीय लिंगायत समाज वधु वर परिचय मेळावा संपन्न

लिंगायत समाजाचा आंतरराज्यीय लिंगायत समाज वधु वर परिचय मेळावा संपन्न

( हजारो बांधवांची उपस्थिती,वीरशैव हितसंवर्धक मंडळाचा उपक्रम)

लिंगायत समाजाचा आंतरराज्यीय लिंगायत समाज वधु वर परिचय मेळावा संपन्न
X

वीरशैव हितसंवर्धक मंडळ यवतमाळ

मागील ३१ वर्षापासून आंतरराज्यीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करीत आहे

यावर्षी सुद्धा आंतरराज्यीय लिंगायत समाज उपवधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन महात्मा बसवेश्वर भवन,लोहारा येथे करण्यात आले या मेळाव्याला सुद्धा समाज बांधवांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.


विशेषतः कोरोना काळाच्या नंतर हा पहिला मेळावा ऑफलाइन पध्दतीने घेण्यात आला.या मेळाव्यामध्ये सातशे च्या वर मुला मुलींनी नोंदणी केल्या, यवतमाळच्या वधू-वर परिचय मेळाव्याला जवळपास तीन हजाराच्या वर समाजबांधवांनी, उपस्थिती दर्शवली.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी वीरशैव हितसंवर्धक मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ अशोक मेनकुदळे मेळाव्याचे उद्घाटन म्हणून मुर्तिजापूर चे आमदार श्री हरिषजी पिंपळे, प्रमुख पाहुणे अमरावती चे मनोहरआप्पा कापसे, महेश शेटे अकोला,चंद्रशेखर अनवाणे नागपूर, वीरशैव हितसंवर्धक मंडळाचे अध्यक्ष डॉ.जयेश हातंगावकर ,उपाध्यक्ष प्रा.डॉ किशोर मांडगावकर सचिव निलेश शेटे सौ.उर्मिलाताई कासवे,सौ.विद्या बेलोरकर, ईत्यादींची उपस्थीती होते.

वीरशैव हितसंवर्धक मंडळाचे सचिव निलेश शेटे ह्यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये मंडळाचा लेखाजोखा मांडतांना मंडळाच्या प्रगतीचा अहवाल वाचुन दाखविला,तसेच मंडळाला नोंदणी प्रकीयेत मदत करणारे अभय देमापुरे ह्या सत्कार करण्यात आला,

मेळाव्या मध्ये माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, आणि त्याच दिवशी माहिती पुस्तिका उपवर-वधुंना वितरीत करण्यात आली, मेळाव्याला मार्गदर्शन करताना आमदार हरिषजी पिंपळे यांनी यवतमाळ मेळाव्याचे भरभरून कौतुक करीत मेळावा ही आजच्या काळाची गरज आहे,यवतमाळच्या मेळाव्याची किर्ती सर्व दुर महाराष्ट्राच्या बाहेर सुध्दा आहे हे ह्या गर्दीवरून दिसत आहे असे संबोधित केले, तसेच मेळाव्याला अमरावती लिंगायत समाजाचे अध्यक्ष श्री मनोहरआप्पा कापसे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते, ते संबोधित करताना म्हणाले यवतमाळ चा मेळावा हा संपूर्ण राज्यामध्ये तसेच राज्याच्या बाहेर सुद्धा नावाजलेला आहे आपल्या वेगळ्या शैलीमुळे यवतमाळ चा मेळावा नावारूपास आलेले आहे आणि विशेषतः दरवर्षी विविध राज्यातुन तसेच राज्याबाहेरील नोंदणी या मेळाव्यामध्ये येतात हि यवतमाळ मेळ्याव्याची जमेची बाजु आहे असे ते म्हणाले, यवतमाळ चा मेळावा म्हणजे अकल्पितच म्हणावा लागेल असे,प्रशंशापर उद्गार काढले,महेश शेटे,चंद्रशेखर अनवाणे ह्यांनी सुध्दा समयोचीत संबोधित केले


तसेच मेळाव्याला विशेष आमंत्रित म्हणुन विजय ओढे,उदय गाढवे,अशोक जिवरकर, रमेश जुननकर,अमरावती,अजय शेवाळकर,वसंतराव मरडवार वर्धा,राजेश एमगवळी,विणाताई चेडगे,छिंदवाडा, ईत्यादी उपस्थित होते

आजच्या काळात , पालकांना लग्न जुळणे करता बाहेर निघणे दिवसेंदिवस कठीण झाले आहे, याच बाबीकडे लक्ष देऊन वीरशैव हितसंवर्धक मंडळाने उपवधु वर परिचय मेळावा घेण्याचे ठरवले, या वधू-वर परिचय मेळाव्याला आंध्र प्रदेश गुजरात कर्नाटक,बँगलोर, तेलंगाना,जयपुर,राजस्थान, मध्यप्रदेश, इत्यादी राज्यातील उपवर-वधू नी हजेरी लावली आणि आपला परिचय दिला.

यामध्ये परीचय देणाऱ्या उप वधूवरांना वसुधा प्रतिष्ठान तर्फे सन्मानचिन्ह व रोख 1551 रुपये त्यांना ताबडतोब देण्यात आले,तसेच सौ.सिमा केळकर ह्यांना ड्रॉ पध्दतीने विशेष असे गळ्यामध्ये चांदीचे लिंबु घातले असल्यामुळे त्यांना आकर्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला,सृष्टी अलंकार द्वारा पुणेरी चिंचपेटी(नेकलेस),चांदीची फोटो फ्रेम उपवर वधुनां देण्यात आले, शिवानंदआप्पा कुल्ली संतोष आप्पासंतोष आप्पा तडसे पुसद,बाळासाहेब नंदे,कारंजा, गजानन हमदापुरे,बाळासाहेब हवा,मंगरूळ पीर, राजेश्वर पट्टम,हिंगोली,रमेश केळकर,खंडेराव देशमुख डॉ.विजय उमरे यांच्या द्वारा चांदीचे लिंबु (लिंग) लकी ड्रॉ द्वारा भेट म्हणून प्रदान करण्यात आली.


या कार्यक्रमाचे सूत्र संचालन मंगेश शेटे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गिरीश गाढवे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता डॉ.जयेश हातंगावकर, प्रा.डॉ किशोर मांडगावकर,निलेश शेटे,गिरीश गाढवे गजानन हातगांवकर, रमेश केळकर,चंद्रशेखर उमरे, विनोद देशमुख, नागेश कुल्ली, जयंत डोंगरे, भुषण तंबाखे, विनोद नारिंगे ,राजु कुऱ्हेकार, बाळासाहेब दिवे सुरेश शेटे,अशोक तेले,अभय देमापुरे, मंगेश शेटे,सुधाकर केळकर,संजय तोडकरी संजय कोचे, निर्मल ठोंबरे , प्रदीप उमरे,कैलास ठोंबरे,अभिजित हातगांवकर, महेंन्द्र ठोंबरे,प्रविण मिरासे,अशोक जिवरकर, गौरव दिवे प्रदिप उमरे, अजय खारपाटे,राजु मेनकुदळे,पंकज शेटे, विलास केळकर,विद्या बेलोरकर,कल्पना देशमुख,पद्मश्री हातगांवकर,उषा कोचे,रेणुका कुल्ली,शिल्पा बेगडे,स्वाती हातगांवकर,उज्वला नारिंगे,योगिता दर्यापुरकर,लिना चांभारे,सिमा केळकर,सुवर्णा निकडे,वंदना बोनकीले,ह्यांचे सहकार्य लाभले.

----------------------------------------------


Updated : 24 Nov 2022 2:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top