Home > News > सिद्ध सद्गुरु शांतिनाथ महाराज यांच्या उपस्थितीत श्रीनाथ योगाश्रम रामगाव रामेश्वर येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

सिद्ध सद्गुरु शांतिनाथ महाराज यांच्या उपस्थितीत श्रीनाथ योगाश्रम रामगाव रामेश्वर येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

In the presence of Siddha Sadguru Shantinath Maharaj, various religious programs were organized at Srinath Yoga Ashram Ramgaon Rameshwar

सिद्ध सद्गुरु शांतिनाथ महाराज यांच्या उपस्थितीत श्रीनाथ योगाश्रम रामगाव रामेश्वर येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
X

कारंजा :- रामगाव रामेश्वर ता.दारव्हा येथील श्री नाथ योगाश्रम येथे दिनांक १७ ते १९ मार्च रोजी गुरु चरण पादुका व काशी विश्वेश्वर शिवलिंगाच्या प्राण प्रतिष्ठेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित वार्षिक नवनाथ ग्रंथ पारायणाची समाप्ती ,महायज्ञ कार्यक्रमाचे आयोजन सिद्ध सद्गुरु शांतिनाथ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे. श्री नाथ योगाश्रम हे ठिकाण कारंजा ते दारव्हा रोडवर सांगवी येथिल नवीन पुलाजवळ आहे.येथील कार्यक्रम दिनांक १७ मार्च ते १९ मार्च पर्यंत आहेत. दिनांक १७ मार्च रोजी सकाळी ८ ते ९ वाजता काशी विश्वेश्वर शिवलिंग अभिषेक श्री सिद्ध सद्गुरु गोरक्षनाथ महाराज समाधी अभिषेक ,पूजा , स्वाहाकार आरती संपन्न होईल. सकाळी सकाळी ९ ते ४ वाजता श्री जितेंद्र पाठक गुरुजी व त्यांचे सहकारी ब्रम्हवृंद यांच्या हस्ते समाधि अभिषेक करतील. सकाळी ११ ते १२ वाजता श्री ह भ प मंगलनाथ महाराज, श्रीनाथ योगाश्रम भेडाघाट मध्य प्रदेश यांचे प्रवचन होईल .दुपारी १२ ते १ वाजता श्री निवृत्ती राघोजी सुर्वे राहणार लाठी तालुका मंगरूळनाथ जिल्हा वाशिम यांच्यातर्फे महाप्रसाद होईल .संध्याकाळी ६ ते ७ वाजता कपिलेश्वर महाराज हरिपाठ भजनी मंडळ सातेफळ यांचा हरिपाठ चा कार्यक्रम आहे .संध्याकाळी ९ ते ११ वाजता श्री ह.भ.प.गोपालनाथ महाराज यांचे हरिकीर्तन होत आहे. दिनांक १८मार्च रोजी सकाळी ८ ते ९ वाजता काशी विश्वेश्वर शिवलिंग अभिषेक,श्री सिद्ध सद्गुरु गोरक्षनाथ महाराज समाधी अभिषेक ,पूजा स्वाहाकार आरती होईल. सकाळी ११ते १२ वाजता श्री ह. भ .प .एकनाथ महाराज भिंगारे यांचे प्रवचन होईल. दुपारी १२ते १ वाजता एकादशी फराळ श्रीरामनाथ किसनराव राहणार लोहगाव हल्ली मुक्काम दिघी तालुका कारंजा जिल्हा वाशिम यांच्यातर्फे आहे .संध्याकाळी ६ते ७ वाजता कपिलेश्वर महाराज हरिपाठ भजनी मंडळ सातेफळ यांचा हरिपाठ चा कार्यक्रम आहे .संध्याकाळी ७ ते ८ वाजता एकादशी फारशी दत्तात्रय गहिनीनाथ फुंदे रामगाव रामेश्वर तालुका दारव्हा यांच्यातर्फे होईल .संध्याकाळी ९ ते ११ वाजता श्री ह. भ. प. रामायणाचार्य श्रीहरी महाराज खेडकर आळंदी( देवाची )यांचे हरिकीर्तन .दिनांक १९ दिनांक 19 मार्च रोजी सकाळी ८ ते १०.३० वाजता काशी विश्वेश्वर शिवलिंग अभिषेक, श्री सिद्ध सद्गुरु गोरक्षनाथ महाराज समाधी अभिषेक पूजा व शिव गायत्री महायज्ञ व नवनाथ ग्रंथ पारायण सांगता, स्वाहाकार, आरती होइल. सकाळी ११ते १२ वाजता ह. भ .प. सिद्ध योगी गुरुवर्य श्री शांतिनाथ महाराज यांचे प्रवचन होईल . दुपारी १२ ते ३ वाजता महाप्रसाद श्री राजेश विठ्ठलराव ठाकरे मंगरूळ नाथ श्री ज्ञानदेव बाबाराव लोडम मंगरुनाथ यांच्यातर्फे आहे. कार्यक्रमाचे पारायण वाचक श्री ह भ प गोपालनाथजी महाराज आहेत .कार्यक्रमाचे संचालक श्री ह भ प महेश नाथ महाराज श्रीनाथ योगाश्रम रामगाव रामेश्वर , व्यवस्थापक श्री सद्गुरु योगी श्री शांतिनाथ महाराज सेवा मंडळ रामगाव रामेश्वर तसेच पंचक्रोशीतील सावंगी वरुड बोदेगाव, हातोला दिघि ,म्हसनी ,पिंपळगाव ,सोमठाणा , चिखली तालुका दारव्हा जिल्हा यवतमाळ येथील भक्तगण आहेत या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री सद्गुरु श्री शांतिनाथ महाराज सेवा मंडळ श्री राजेश विठ्ठलराव ठाकरे श्री ज्ञानदेव बाबाराव लोडम, व इतर भक्त मंडळी यांनी केले असल्याचे वृत्त श्री सिद्ध सद्गुरु शांतीनाथ महाराजांचे कारंजा येथील शिष्य राजिव भेंडे यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना प्रत्यक्ष भेटून दिना आहे.

Updated : 19 March 2023 12:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top