Home > News > जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालयात रुग्ण हक्काची सनद दर्शनी भागात लावा

जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालयात रुग्ण हक्काची सनद दर्शनी भागात लावा

अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे निवेदनाद्वारे मागणी

जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालयात रुग्ण हक्काची सनद दर्शनी भागात लावा
X

जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालयात रुग्ण हक्काची सनद दर्शनी भागात लावा

अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे निवेदनाद्वारे मागणी

राजेश ढोले पुसद प्रतिनिधी

पुसद: खाजगी रुग्णालयांनी रुग्ण हक्काची सनद व दर पत्रक (द चार्टर ऑफ पेशंट राईट्स) ची माहिती दर्शणी भागात लावणे कायद्याने बंधनकारक असूनही यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश रुग्णालयात रुग्ण हककाची सनद लावण्यात आलेली नाही. त्यामुळे रुग्णांना कोणत्या रोगावर किती पैसा खर्च होणार ही व अशी बरीचशी माहिती मिळत नाही. काही रुग्णालय दर अधिक लावून रोगीकडून जास्तीचे पैसे उकळतात. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच रुग्णालयात रुग्णांच्या हक्काची सनद दर्शनी भागात लावण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष संजय आडे यांनी उपविभागीय अधिकारी पुसद यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जुन २०१९ मध्ये रुग्ण हक्काची सनद राज्यातील सर्व खाजगी व सरकारी रुग्णालयांमध्ये दर्शणी भागात लावण्याचे आदेश जारी केले होते. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने सप्टेंबर २०२० आणि मे २०२१ मध्ये या विषयीचे आदेश निर्गमित केले आहेत.

कोरोना काळातील खाजगी रुग्णालयांमधील गैरप्रकार व रुग्णांचे झालेले शोषण आदीची दखल सरकारणे घेऊन राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व जिल्हयाना वरील आदेश दिले होते. रुग्ण हक्काच्या सनद मध्ये रुग्नाला प्राप्त असलेले अधिकार, आजाराच्या प्रकाराची माहिती मिळण्याचा हक्क, तपासण्यांचे तपशील, उपचारांचे परिणाम, अपेक्षित खर्च, तपासण्यांचे अहवाल व सविस्तर बिले मिळण्याचा हक्क या सारखे अनेक अधिकार रुग्णांना मिळतात.

त्यामुळे यवतमाळ जिल्हृयातील सर्व नोंदणीकृत खाजगी रुग्णालयात १५ दिवसाच्याआत रुग्ण हक्कांची सनद (द चार्टर ऑफ पेशंट राईट्स) ची माहिती दर्शणी भागात लावण्यात यावी व त्या बाबतचा अहवाल कार्यालयास सादर करण्याचे आदेश निर्गमित करण्यात यावे तसेच सदर आदेशाचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांचा परवाना रद्द करण्यात यावा असे निवेदन पुसद उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी,कार्तिकीयेन् एस यांचे मार्फत यवतमाळ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना तांडा सुधार समिती मार्फत संजय मदन आडे यांनी केली आहे.

Updated : 27 May 2023 4:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top