Home > News > सेवेकरी गजानन जगताप आत्महत्याप्रकरणी गुरव समाजबांधव आक्रमक

सेवेकरी गजानन जगताप आत्महत्याप्रकरणी गुरव समाजबांधव आक्रमक

मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी उपस्थित राहण्याचे माळेकर यांचे आवाहन

सेवेकरी गजानन जगताप आत्महत्याप्रकरणी गुरव समाजबांधव आक्रमक
X

फुलचंद भगत

वाशिम - ट्रस्ट पदाधिकार्‍यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून हिंगोली जिल्हयातील घोटादेवी संस्थानचे गुरव समाजाचे सेवेकरी गजानन किसन जगताप यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली होती. जगताप यांच्या आत्महत्या प्रकरणी फरार आरोपींवर त्वरीत अटक होण्यासह जगताप कुटुंबियांच्या आर्थिक मदतीसाठी जिल्हयातील गुरव समाजाच्या एकजुटीतुन शुक्रवार, २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आहे. तरी समाजबांधवाला न्याय मिळण्यासाठी जिल्हयातील गुरव समाजाचे आपल्या एकजुटीचे प्रदर्शन घडवून निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गुरव समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर माळेकर, महिला जिल्हाध्यक्षा स्वातीताई विटकरे, युवा जिल्हाध्यक्ष निखिल खंडाळकर, माधव विटकरे, गोपाल डिडाळकर, संजय विटकर, किसन बोरकर, डॉ. नारायण लव्हाळे, मारुती वाघमारे, सुहास विटकरे, बाळाभाऊ इथापे, किशोर इथापे आदींनी केले आहे.

जगताप यांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या व फरार झालेल्या ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांन्या त्वरीत शोधून अटक करावी, खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, सरकारने चांगला वकील द्यावा, उघड्यावर पडलेल्या जगताप परिवाराला शासनाने त्वरीत अर्थसहाय्य देवून त्यांचे पुनर्वसन करावे, जगताप कुटुंबातील एका सदस्यास शासकीय नोकरी द्यावी अशा मागण्या निवेदनात मांडण्यात येणार आहेत. आज गुरव समाजातील एका व्यक्तीवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. समाज हा अन्याय असाच सहन करत राहीला तर गुरव समाजावर अन्याय- अत्याचाराची मालिका वाढतच जाईल. त्यामुळे समाजाने अन्याय सहन न करता संघर्ष करण्यासाठी एकजुटीने एकत्र येवून आपल्या बांधवाला न्याय मिळण्यासाठी २३ सप्टेंबरला वेळ काढून उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Updated : 24 Sep 2022 1:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top