Home > News > "वाशिम जिल्ह्याच्या सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचा कारंजा येथे भव्य मेळावा "

"वाशिम जिल्ह्याच्या सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचा कारंजा येथे भव्य मेळावा "

महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख घडविणार्‍या वारकरी संप्रदाय मेळाव्याचा वारकर्‍यांनी लाभ घ्यावा.- ह.भ.प. श्रीकृष्ण महाराज राऊत.

वाशिम : मराठा सेवा संघ प्रणित,संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद , जिल्हा शाखा वाशिमच्या वतीने, कारंजा येथे वारकरी संप्रदायाचा पहिला मेळावा भव्य दिव्य स्वरूपात कारंजा येथील श्री एकविरा देवी संस्थान, माळीपूरा येथे, जागतिक दिव्यांग दिनाचे औचीत्य साधून, शनिवार दि. ३ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता होऊ घातलेला असून, सदर्हू कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून, कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार शिवश्री राजेंद्रजी पाटणी राहणार असून, मेळाव्याचे अध्यक्षस्थानी संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद वाशिमचे जिल्हाध्यक्ष शिवश्री हभप श्रीकृष्ण महाराज राऊत, प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक म्हणून वाशिम मंगरूळपिर विधानसभा मतदार संघाचे आमदार शिवश्री लखनजी मलिक, रिसोड - मालेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार शिक्श्री अमित झनक, अमरावती विधानपरिषद शिक्षक मतदार संघाचे आमदार शिवश्री ऍड किरणराव सरनाईक, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद वाशिमचे अध्यक्ष शिक्श्री चंद्रकांतदादा ठाकरे, मराठा सेवा संघ वाशिमचे जिल्हाध्यक्ष शिवश्री नारायणराव काळबांडे, माजी नगराध्यक्षा शिवमती उर्मिलाताई इंगोले, शिवमती सौ. आशाताई कृष्णराव गाडगे, दिव्यांग किर्तनकार शिवमती हभप कु . चित्राताई महाराज वाकोडे,स्वागताध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद समाज कल्याण वाशिमचे माजी सभापती शिवश्री जयकिसन राठोड, आयोजक संत नामदेव तुकाराम वारकरी पासषदेचे तालुकाध्यक्ष शिवश्री हभप संजय महाराज कडोळे असणार आहेत. सदर्हू मेळाव्याद्वारे संत तुकाराम महाराजांच्या "मराठा तेतुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा." ह्या उक्तीला अनुसरून, मराठा सेवा संघाचे कार्य वारकरी संप्रदायाद्वारे पूर्ण करण्याकरीता, वारकरी दिंडी सोहळ्यातून, किर्तन-प्रवचन-भजन-गोंधळ-जागरण इ .धार्मिक व आध्यात्मिक प्रचार प्रसार, राष्ट्रिय एकात्मता सर्वधर्म समभाव बंधुभाव शांती सलोखा परोपकार दिव्यांग सेवा - जन्मदात्या आई वडीलांची सेवा इत्यादी उद्दिष्टा बद्दल जनजागृती केली जाईल. त्या बद्दल कार्यक्रमाची रूपरेषा म्हणजे , शनिवार दि . ३ डिसेंबर रोजी , सर्वप्रथम वारकरी दिंडी ( सहभाग : वारकरी भजनी मंडळ आणि विशेष आकर्षण संत सेवालाल महाराज बंजारा भजन मंडळ लोहारा, सेवालाल महाराज भजन मंडळ वडगाव इजारा )१) नगर परिषद चौक कारंजा ते श्री कामाक्षा मंदिर, श्री गुरुमंदिर चौक, श्री विठ्ठल मंदिर चौक, लोकमान्य नगर नागोबा बोकोबा मंदिर मार्ग, अवधुत संस्थान, ते माळीपूरा श्री एकविरा मंदिर पर्यत, वारकरी दिंडी . २) सकाळी १०:३० वाजता, संत पूजन,दिपप्रज्वलन तथा मान्यवरांचा स्वागत समारोह ३ ) सकाळी ११:०० वाजता, जागतिक दिव्यांग दिना निमित्त, दिव्यांग किर्तनकार शिवमती हभप कु . चित्राताई महाराज वाकोडे यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार समारंभ तसेच साहित्यीक-पत्रकारिता-शैक्षणिक-कला-लोककला-विधी -वैद्यकिय व सामाजिक क्षेत्रातील सेवाव्रतींचा राज्यस्तरिय पुरस्काराने गुण गौरव सोहळा, व पाहिल्या सत्राचे समापन प्रमुख मान्यवरांना निरोप. (दुपारी १२ : १५ वाजता मान्यवर लोकप्रतिनिधीच्या हस्ते महात्मा गांधी चौक कारंजा येथे साप्ताहिक करंजमहात्म्य वृत्तपत्र कार्यालय आणि महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार संघ कार्यालयाचा उदघाटन सोहळा) त्यानंतर दुपारी १२ वाजता श्री एकविरा संस्थान येथे श्री बहिरीनाथ महिला भजन मंडळ दोनद तसेच शेषराव महाराज इंगोले (पाटील) यांच्या श्री आसरा माता महिला मंडळ आणि जय भवाणी जय मल्हार गोंधळी कला संच तसेच वारकरी मंडळाचे सामुहिक भजन. शिक्षक आमदार एड किरणराव सरनाईक यांच्या उपस्थितीत, दुपारी २:०० वाजता, दिव्यांग महिला किर्तनकार यांच्या सुमधूर वाणीतून किर्तन व शेवटी दुपारी ठिक ०३:०० वाजता, जय भवाणी जय मल्हार गोंधळी नवरात्रोत्सव मंडळ कारंजा कडून सालाबादचा नवरात्रोत्सवा निमित्ताचा महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. सदर्हु कार्यक्रमाला, शिक्षक आमदार ऍड किरणराव सरनाईक, श्री एकविरा माता संस्थान मित्रमंडळाचे धर्मनिष्ठ समाजसेवी बंटीभाऊ उर्फ सत्यजित कृष्णराव गाडगे, भाजपा कारंजा शहर अध्यक्ष ललितसेठ चांडक, शिवसेना शहर प्रमुख गणेश बाबरे, माजी जि प उपाध्यक्ष देवेन्द्र उर्फ अरुण ताथोड, नगरसेवक प्रसन्न पळसकर, नगरसेवक नितीन गढवाले, समाजसेवक अमोल लुलेकर,माजी पं.स.सभापती दिलीप पाटील दवंडे, संजय कडोळे यांचे बाल सवंगडी गिरीष जोशी, संत गाडगे बाबा विचार मंच बहु संस्थेचे संचालक भारत हांडगे, सेवाव्रती प्रसिद्धी प्रमुख उमेश अनासाने , वैदर्भिय नाथ संघटनेचे संस्थापक एकनाथ पवार, श्री कामाक्षा देवी संस्थानचे सचिव रोहीत महाजन, महा.गोंधळी समाज मंडळाचे जिल्हाध्यक्ष दिनेश कडोळे, संचालक प्रतिक हांडे,अ.भा.नाटय परिषद मुंबईचे नियामक मंडळ सदस्य नंदकिशोर कव्हळकर, ईरो फिल्मसचे डॉ इम्तियाज लुलानिया, रोमिल लाठीया, डॉ ज्ञानेश्वर गरड, देविदास नांदेकर, विजय खंडार, देविदास नांदेकर , सुभाष पाटील गाडगे, जैन संघटनेचे ऍड. संदेश जिंतुरकर, कारंजा अ भा नाटय परिषदेचे कोषाध्यक्ष मोहित जोहरापूरकर ,समाजसेविका सौ छायाताई गावंडे, पाटील ऍटोमोबाईल्सचे विशाल पाटील डहाके, जिव्हाळ्याचे किशोर धाकतोड, कारंजा पत्रकार मंचाचे सचिव किरण क्षार, हिमंत मोहकर,सागर ग्रॉफिक्सचे, सागरआप्पा टेवरे वैद्यकिय सामाजिक क्षेत्रातील डॉ . मुजफ्फर खान, कारंजा तहसिलचे तहसिलदार धिरज मांजरे, कारंजा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक आधारसिह सोनोने, कामगार कल्याण केन्द्राचे प्रेमकांत राऊत, कारंजा आगाराचे आगार प्रमुख मुकूंद नावकर, कारंजा नगर परिषदेचे कर्मचारी राहुल सावंत, वाशिम पत्रकार संघाचे संदिपआप्पा पिंपळकर, यांचेकडून निस्वार्थ सेवा मिळणार आहे. तर अन्नपूर्णा समुहाचे महेश चौधरी यांचेकडून कॅटरर्स सेवा आणि जगन्नाथ कश्यप यांचे कडून जलसेवा मिळणार आहे. सदर्हु कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिवमती प्रणिताताई दसरे तर आभार प्रदर्शन शिवश्री नंदकिशोर कव्हळकर हे करतील. हा कार्यक्रम पूर्णतः वारकरी मंडळी व भाविक भक्तांकरीता मर्यादित स्वरूपाचा असल्यामुळे,वाशिम जिल्हातील जास्तित जास्त वारकरी मंडळीनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन , संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे तालुकाध्यक्ष शिवश्री हभप.संजय महाराज कडोळे यांचे वतीने,संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष शिवश्री हभप श्रीकृष्ण महाराज राऊत , मंगरूळपिरचे परिषद प्रमुख हभप राजाराम पाटील राऊत महाराज तसेच मानोरा येथील परिषद प्रमुख हभप लोमेश पाटील चौधरी महाराज यांनी केले आहे.

Updated : 25 Nov 2022 4:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top