Home > News > संकल्प भोजन सेवेला शहरातील पत्रकार बांधवांची सदिच्छा भेट

संकल्प भोजन सेवेला शहरातील पत्रकार बांधवांची सदिच्छा भेट

Goodwill visit of journalists from the city to Sankalp Bhojan Seve

गेल्या 2 जानेवारी पासून संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस भरती प्रक्रिया सुरु असून, एकट्या यवतमाळ शहरांत,महाराष्ट्रातून आलेल्या युवा उमेदवारांची भोजन व निवासाची परवड होऊ नये म्हणून संकल्प फाउंडेशन च्या वतीने व यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड ह्यांच्या मार्गदर्शनात संकल्प भोजन सेवेचा महायज्ञ् यवतमाळकरांच्या सहकार्याने निरंतर सुरु असून, ह्या उपक्रमाला आजपर्यंत शहरातील अनेक मान्यवरांनी भेटी देत ह्या उपक्रमाचे कौतुक केले आहे, आज सदिच्छा भेट देण्याकरिता शहरातील अनेक वृत्त पत्राचे व वृत्त वाहिनीचे प्रतिनिधी उपस्थित होते त्यात प्रामुख्याने दिनेश गंधे,दै. हितवाद, नागेश गोरख, दै. हिंदुस्थान, विजय बुंदेला, दै. सिहंझेप, रुपेश चाफलेकर, दै. पुण्य नगरी, सुकांत वंजारी, दै लोकनायक, अशोक गोडंबे, दै लोकदूत, दीपक शास्त्री yz news,जयंत राठोड, दै. रणसंग्राम, नितीन राऊत, दै. यवतमाळ न्यूज, विवेक वानखडे, दै. जनमाध्यम, भीमराव गणवीर, दै. वृत्तनामा,राहुल वासनिक, दै. विदर्भ कल्याण उपस्थित होते, सर्व पत्रकार बंधुनी ह्यावेळी संकल्प भोजन सेवेच्या व निवास व्यवस्थेच्या ह्या ऐतिहासिक उपक्रमाचे भरभरून कौतुक केले, व्यासपीठावर अवधूतवाडी पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री मनोज केदारे उपास्थित होते, येत्या 27 जानेवारी पासून ह्या पोलीस भरती प्रक्रियेसाठी राज्यभरातून रोज 1500 महिला उमेदवार प्रत्यक्ष भाग घेणार असून, त्यांच्या निवासाची उत्तम व्यवस्था प्रशासनाच्या मदतीने व संकल्प वनिता वाहिनीच्या महीला विंग च्या देख रेखी खाली करण्यात येणार असल्याचे संकल्प फाउंडेशन चे जिल्हाध्यक्ष प्रलय टिप्रमवार ह्यांनी सांगितले, ह्या संकल्प भोजन सेवेच्या महायज्ञासाठी यवतमाळकरांचे अनमोल सहकार्य लाभले असून, हा संकल्प भोजन सेवेचा महायज्ञ् येत्या 31जानेवारी पर्यंत यशस्वी रित्या पार पडेल असे मत संकल्प फाउंडेशन चे पाठीराखे प्रा घन:श्याम दरणे, सुरेश राठी, प्रशांत बनगिनवार, अनंत कौलगीकर, प्रदीप ओमनवार, अनिल गायकवाड ह्यांनी व्यक्त केले असून हा महायज्ञ् संकल्प फाउंडेशन,संकल्प वनिता वाहिनी,इंदिराजीव ट्रस्ट, महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन च्या सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या अथक परिश्रमाने व शिस्तबध नियोजनाने पार पडेल ह्यात तिळमात्रही शंका नाही असे प्रतिपादन संकल्प फाउंडेशन चे सरचिटणीस वसंत शेळके ह्यांनी केले आहे.

Updated : 24 Jan 2023 6:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top