Home > News > भंडारदरा येथे जागतीक आदिवासी मोठ्या उत्साहात साजरा

भंडारदरा येथे जागतीक आदिवासी मोठ्या उत्साहात साजरा

Global tribals celebrate with great enthusiasm at Bhandardara

राघोजी भांगरे यांच्या स्मारकाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी

अहमदनगर प्रतिनिधी विठ्ठल खाडे

अहमदनगर:- अकोले तालुक्यातील भंडारदरा येथे ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथुन रॅलीला सुरुवात करून मारुती मंदिर ते आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे चौक अशी झाली नंतर अकोले तालुक्यातील भव्य दिव्य असलेल्या राघोजी भांगरे यांच्या स्मारकाचे पुजन करण्यात आले या वेळेस या ठिकाणी चाळीस गाव डांगाना सह संपूर्ण तालुक्यातील आदिवासी तरुणांनी मोठी गर्दी केली होती,भंडारदरा येथिल बोट व्यावसायिकानी या वेळेस केळांचे वाट करत आपले योगदान दिले नंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भंडारदरा व दर्याचीवाडी येथिल विद्यार्थ्यांनी आदिवासी वेशभूषा सह आदिवासी कला मारुती मंदिर येथील सभामंडपात सादर केल्या या जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमा साठी जि.प. शाळेचे सर्वच शिक्षका, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक,ग्रा.प. सदस्य तसेच गावातील तरुणांनी, महिलांनी मोठा सहभाग घेतला होता

Updated : 10 Aug 2022 9:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top