जे.आय.एस.च्या गणेश सिरसाठ यांची पंच म्हणून निवड
Ganesh Sirsath of JIS has been selected as the umpire
X
यवतमाळ
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र, राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २२ ते २४ जानेवारी २०२३ या कालावधीत विभागीय क्रीडा संकुल मानकापूर, नागपूर येथे जाजू इंटरनॅशनल स्कूलचे हँडबॉल प्रशिक्षक श्री गणेश शिरसाट सर यांची पंच म्हणून निवड झाली.
सदर स्पर्धेत राज्यातील एकूण ६०० खेळाडू व पंच यांचा सहभाग होणार आहे. राज्यस्तर शासकीय शालेय हॅन्डबॉल क्रीडा स्पर्धेसाठी १७ ते १९ वर्ष वयोगटातील मुले व मुलींचा समावेश होणार आहे. सकाळी ९ ते स्पर्धा संपेपर्यंत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी गणेश सरांची पंच म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रकाशजी जाजू सर, सचिव माननीय आशिषजी जाजू सर यांनी शुभेच्छा दिल्या तर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शिल्पा जाजू मॅडम यांनी "हा शाळेच्या बहुमानातील मानाचा तुरा आहे" या शब्दांत अभिनंदन करीत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
शाळेचे उपमुख्याध्यापक अश्विन जगताप सर, समन्वयक साबेरा बाटावाला मॅडम आणि प्रशासकीय अधिकारी अंकुश पाटील सर यांनीही शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व क्रीडा शिक्षकांनी गणेश सरांच्या निवडीबाबत सकारात्मक दृष्टिकोन दाखवत "असा क्षण क्रीडा शिक्षकांच्या जीवनातील अलौकिक क्षण असतो त्यासाठीच ते सतत प्रयत्नशील असतात." अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी सुद्धा गणेश सरांविषयी गौरवोद्गार काढले.