Home > News > 26 नोव्हेंबर पासून बंधुता अभियान

26 नोव्हेंबर पासून बंधुता अभियान

मुव्हमेंट फॉर पीस अँन्ड जस्टीस चा उपक्रम

26 नोव्हेंबर पासून बंधुता अभियान
X

26 नोव्हेंबर पासून बंधुता अभियान

मुव्हमेंट फॉर पीस अँन्ड जस्टीस चा उपक्रम

27 ला एम बी कॉलेज यवतमाळ येथे कार्यक्रम

यवतमाळ येथे नियोजन सभा संपन्न


प्रतिनिधी यवतमाळ :भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. ही विविधता देशभरात दर मिनिटागणिक साजरी केली जाते. या च विविधतेपोटी भाषा, संस्कृतीविश्वास, जात, धर्म, लिंग, व्यवसाय इत्याददीवर आधारित हजारोंची छोटी-छोटी ओळख तयार झाली आहे. हीच ओळख जेव्हा लोक एखादया सामायिक हिताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतात तेव्हा अनेकदा भिती निर्माण करते आणि सामान्य जनतेला एकत्र येण्यात बाधा ठरते. एखाद्या सामायिक लक्ष प्राप्तीसाठी लोकांनी एकत्र येणं म्हणजेत बंधुता, बंधुता हा न्याय, समता आणि स्वातंत्र्य यांना एकत्र बांधून ठेवणारा समान धाग आहे. याच धाग्याने प्रत्येक व्यक्ती ची प्रतिष्ठा व राष्ट्राची अखंडता यांचं रक्षण होते .

ते मुव्हमेन्ट फॉर पीस अॅन्ड जस्टीस फॉर वेलफेअर या सामाजिक संघटनेतर्फे 26 नोव्हेंबर संविधान दिवस ते10 डिसेंबर मानव अधिकार दिवस पर्यंत राबविण्यात येणाऱ्या राज्य स्तरिय बंधुता अभिमान निमित्त इस्लाम पुरा येथे नियोजन सभा घेण्यात आली .

अभियानाचा मूळ उद्दिष्ट समाजात बंधुता पसरविणे असून भारतीय संविधानात मांडलेल्या भारत देशाच्या संकल्पनेला लोकांसमोर मांडणे गरजेचे आहे .


सभेला प्रदेश सचिव हुसेन खान जिल्हा अध्यक्ष फिरोज अन्सारी तालुकाध्यक्ष हाफीज अन्सार हुसैनी यांची प्रमुख उपस्थिती होती .

धर्म, भाषा, प्रांत व विभागीय विविधता यांच्या पलिकडे जाऊन समता, एकता आणि बंधुता यांना चालना देणे गरजेचे असल्याचे सभेत वक्त्या कडून मत मांडण्यात आले .

अभियाना अंतर्गत बंधुता या विषयावर चर्चा सत्र, मिरवणूक काढणे, निबंध व वकृत्व स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिक वितरण, कॉर्नर सभा,जाहीर सभा , हस्त पत्रके वाटप इत्यादी कार्यक्रम घेण्यात येणार आहे .


सभेला संस्थापक सदस्य शोएब साहीर,जिल्हाकार्यकारीणी उपाध्यक्ष प्रतिक्षा नागदिवे, शहरअध्यक्ष - डॉ . सैय्यद मुजाहीद हसन , जुनेद शेख , अँड.शबाना खान , सचिव अय्याज खान, प्रसिध्दी प्रमुख जाकीर खान सह, अकरम भवाल ,ऐतेशाम खान ,इजहार खिलजी, आमिर सोहेल,जावेद उल्ला खान,वसीम खान,नदीम पटेल, ,दानिशुर रहेमान सिमरन सैय्यद आदी कार्यकर्ते उपस्थित होते . शहरातील सर्व समाज सेवक समाज सेवी संघटना संविधान प्रेमी बंधुता प्रेमी नागरिकांनी या अभियानात सहभाग घेण्याचे तसेच दि . 27 नोव्हेंबर रविवारी एम बी खान ज्युनियर कॉलेज चामडीया ले आऊट नागपुर रोड यवतमाळ येथे होणार्‍या लॉंचिग कार्यक्रम सभेत उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष फिरोज अन्सारी यांनी केले .
Updated : 24 Nov 2022 1:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top