Home > News > माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा यांच्या अर्ध्यांगीनी सौ ज्योतिताई यांचे देहावसान .

माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा यांच्या अर्ध्यांगीनी सौ ज्योतिताई यांचे देहावसान .

"जेठूसेठ यांच्या कार्यकर्त्यामध्ये शोककळा. : करंजमहात्म्य परिवाराची श्रद्धांजली "

अटलजी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, नितीन गडकरी यांच्या काळामध्ये वाशिम जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण विदर्भामध्ये भाजपा विरोधी पक्ष सत्तेत असतांना , विरोधी पक्षात राहून भाजपा जीवंत ठेवून भाजपा मजबूत करणारे भाजपाचे सच्चे भिष्माचार्य तथा कारंजा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष जेठूसेठ उर्फ नरेंद्र गोलेच्छा यांच्या पत्नी सौ ज्योतिताई नरेंद्र गोलेच्छा हया गेल्या काही वर्षा पासून दिर्घ आजाराने आजार ग्रस्त होत्या . आज गुरुवार दि . २४ नोहेंबर रोजी सकाळी ४ : ३० वाजता त्यांचे स्वर्गारोहण झाले असून, त्यांच्या जाण्याने गोलेच्छा परिवाराची खूप मोठी हानी झाली आहे . अत्यंत प्रेमळ,सुस्वभावी, हास्यमुख असलेल्या ज्योतिताई कार्यकर्त्यांची आस्थेने चौकशी करायच्या . जेठूसेठ राजकारणात सक्रिय असल्यामुळे त्यांनी कौटूंबिक जबाबदारी समर्थपणे पेलली होती . त्यांच्या जाण्याची वार्ता कळताच, कारंजेकरांनी जेठूसेठ यांच्या निवासस्थानी गर्दी केली आहे . स्थानिक करंज महात्म्य परिवार तथा विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा यांनी आपली भाव पूर्ण श्रध्द्धांजली व्यक्त केली . यामध्ये मुख्यत : संजय कडोळे, लोमेश चौधरी, उमेश अनासाने, सुनिल गुंठेवार, विजय खंडार, किशोर धाकतोड,अतुल धाकतोड, नंदकिशोर कव्हळकर, मोहीत जोहरापूरकर, पांडूरंग माने, अशोक जिचकार, डॉ इम्तियाज लुलानिया, डॉ . ज्ञानेश्वर गरड, रोमिल लाठीया, रोहीत महाजन, कैलास हांडे यांनी शोक व्यक्त केला तसेच परमेश्वर मृतात्म्यास शांती देऊन , परमेश्वर या दुःखातून सावरण्याची नरेंद्र गोलेच्छा आणि गोलेच्छा परिवाराला सावरण्याची शक्ती प्रदान करो अशी भावना व्यक्त केली आहे .

Updated : 24 Nov 2022 9:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top