Home > News > त्रुटीत निघणाऱ्या फोर्मची मतदारांना माहिती देऊन त्रुटीपूर्तता करा

त्रुटीत निघणाऱ्या फोर्मची मतदारांना माहिती देऊन त्रुटीपूर्तता करा

श्याम प्रजापती यांचे विभागीय आयुक्तांना पत्र

त्रुटीत निघणाऱ्या फोर्मची मतदारांना माहिती देऊन त्रुटीपूर्तता करा
X

त्रुटीत निघणाऱ्या फोर्मची मतदारांना माहिती देऊन त्रुटीपूर्तता करा

श्याम प्रजापती यांचे विभागीय आयुक्तांना पत्र


अकोला : पदवीधर मतदार म्हणून निवडणूक विभागाकडे नोंदणी करताना पाचही जिल्ह्यातील अनेक पदवीधरांचे फाॅर्म त्रुटीत निघालेले आहेत. त्या त्रुटींची त्यांना माहिती देऊन त्या दुरूस्त केल्यास मतदारांची संख्या वाढू शकते. त्यामुळे त्याची पुर्तता करावी, अशी मागणी काॅग्रेसच्या पदवीधर सेलचे अध्यक्ष श्याम जगमोहन प्रजापती यांनी गुरूवारी विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे केली. श्याम प्रजापती यांनी दिलेल्या निवेदनानूसार, अमरावती विभागीय पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीकरिता अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा या पाचही जिल्ह्यातून पदवीधरांची नोंदणी निवडणूक विभागाकडे होत आहे. सध्यास्थितीमध्ये प्राप्त माहितीप्रमाणे, पाचही जिल्ह्यातून 1 लक्ष 25 हजार 893 मतदारांची नोंदणी झाल्याची प्रथम यादी निवडणूक विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुषंगाने अनेक पदवीधरांच्या मतदार नोंदणी अर्जांमध्ये त्रुटी येत असल्याने सदर फाॅर्म रद्द करण्यात येत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे त्रुटीत निघणाऱ्या फाॅर्मची माहिती प्रत्यक्ष मतदारांना देऊन त्रुटी पुर्तता करण्याला वेळ द्यावा. जेणेकरून जास्तीत जास्त नागरिक मतदानाचा हक्क बजावू शकतील. अशी मागणी सुद्धा श्याम प्रजापती यांनी निवडणूक विभागाकडे केली आहे. त्यावर निवणूक विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला असून लवकरच यासंदर्भात निर्णय होणार असल्याची माहिती आहे.

Updated : 2 Dec 2022 7:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top