Home > News > जे.आय.एस.चे एक्झाॅटिका'२३ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

जे.आय.एस.चे एक्झाॅटिका'२३ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

Exotica'23 Annual Symposium of JIS celebrated with enthusiasm

जे.आय.एस.चे एक्झाॅटिका२३ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे
X

यवतमाळ

पुस्तकी ज्ञानाबरोबरच कलागुणांद्वारे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा सर्वांगीण व व्यक्तिमत्व विकास होण्याच्या आदर्श भूमिकेतून जाजू इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी एक्झॉटीका'२३ वार्षिक स्नेहसंमेलन "एक विश्व एक स्वप्न" या थीम अंतर्गत घेण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यवतमाळचे तहसीलदार श्री. कुणाल झाल्टे सर तसेच माहेश्वरी मंडळाचे अध्यक्ष श्री. ओमप्रकाश राठी सर, सी.एम.सी.एस.चे प्रशासकीय अधिकारी राजू खोंड सर उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रकाशजी जाजू सर, सचिव माननीय आशिषजी जाजू सर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शिल्पा जाजू मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाची रूपरेषा आखली गेली.

प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात पारंगत असतोच, याचाच पुरावा या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळतो. सर्वप्रथम वर्ग ५ ते ८ च्या विद्यार्थ्यांच्या 'गिटार परफॉर्मन्स'द्वारे प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले. सरस्वती वंदन व दीप प्रज्वलनानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शिल्पा जाजू मॅडम यांनी संपूर्ण वर्षभरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा या सर्व घडामोडींचा लेखाजोखा 'वार्षिक अहवाल' सादर केला.

'गणेश वंदना'ने कार्यक्रमाची सुरूवात झाली. तद्नंतर "विविधतेत एकता" या वर्ग १ व २ च्या विद्यार्थ्यांनी "वसुधैव कुटुंबकम" यावर आधारीत नाटकासह नृत्य सादर केले. वर्ग ३ च्या विद्यार्थ्यांनी "पर्यावरण संरक्षण" यावर आधारीत 'वृक्ष आहेत पर्यावरणाचे आभूषण, यामुळे कमी होते प्रदूषण' हे सांगणारी नाटिका सादर केली.

'आधुनिक तंत्रज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन हीच विकसित देशाची तिजोरी' हे मार्व्हल्स नृत्याद्वारे वर्ग ४ व ५ च्या विद्यार्थ्यांनी दाखविले. मनाला संयमीत करून, धर्माच्या मार्गावर चालणे हाच भगवद्गीतेचा सार हे "ॲट्रिब्यूट्स ऑफ ह्यूमन" या नाटकासह नृत्य प्रकारातून वर्ग ६ व ७ च्या विद्यार्थ्यांनी दाखविले. वर्ग ५ ते ८ च्या विद्यार्थ्यांद्वारे भगवद्गीतेतील १२ व्या अध्यायातील श्लोकांचे पठण करण्यात आले. हॅरी पॉटर यांच्या जीवनातील प्रसंगावर आधारित वर्ग ८ च्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.

शिवाय "वसुधैव कुटुंबकम, वि आर द वर्ल्ड, इफ यू लव्ह द वर्ल्ड, लाईट अ कॅन्डल" वर्ग ३ ते ८ आणि "राजस्थानी गीत" वर्ग ५ च्या विद्यार्थ्यांनी सादर करीत प्रेक्षकांची मने जिंकली.

प्रमुख अतिथी, संस्थाध्यक्ष, सचिव व शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यात "अमेझिंग आर्टिस्ट इन व्हिज्युअल आर्ट्स" यात प्रायमरी विभागातून प्रिशा बंग, सेकंडरी विभागातून लब्धी कोठारी आणि द्वितीया जयपुरिया, "अमेझिंग आर्टिस्ट इन परफॉर्मिंग आर्ट्स" यात प्रायमरी विभागातून अनन्या गवळी व सेकंडरी विभागातून वेद तेलेवार, "रीडर ऑफ द इयर" प्रायमरी विभागातून सकीना बॉम्बेवाला व सेकंडरी विभागातून टिशा जयपुरिया, "स्पेक्टॅकुलर स्पेलर" यात ग्रुप अ मधून अनय चिंतावर, ग्रुप ब मधून सकीना बॉम्बेवाला, ग्रुप क मधून आस्था जाजू, "मॅथ्स विझ्" यात ग्रुप अ मधून अनाया जाजू, ग्रुप ब मधून चिराग जांगिड, "स्टुडन्ट ऑफ द इयर" प्रायमरी विभागातून अनाया जाजू व सेकंडरी विभागातून वेद तेलेवार यास मिळाला. बेस्ट स्पोर्ट्सपर्सन प्रायमरी विभागातून लोभस्वी कडू व सेकंडरी विभागातून परी जयस्वाल यांना मिळाला तसेच ॲनिवल अवॉर्ड यात "बेस्ट क्लास ऑफ द इयर" वर्ग २ जान्हवी इंगोले यांचा वर्ग आणि "बेस्ट स्टुडन्ट ऑफ द इयर" वर्ग ६ चा वेद तेलेवार ठरला. "बेस्ट हाऊस ऑफ द इयर" हिमालया हाऊस यांना ट्राॅफी देऊन गौरविण्यात आले. या हाऊसचे वैशाली गायकवाड आणि मनोज चावरे सर लिडर होते.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय कुणाल झाल्टे सर यांनी "शिक्षण घेत असताना शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध पैलूंचा विचार जाजू इंटरनॅशनल स्कूल घेते तसेच सैद्धांतिक नाही तर व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिले जाते" अशा शब्दांत शाळेचा गौरव करीत पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सांस्कृतिक कार्यक्रमास पुनम जाजू, किशोर जाजू, दर्शन जाजू, अभिषेक जाजू व परीवार तसेच सी.एम.सी.एस.चे प्राचार्य रितेश चांडक सर, जे.जे.सी.चे प्राचार्य सुधीर वेलुरकर सर, जाजू इंग्लिश मीडियमचे मुख्याध्यापक सतीश उपारे सर, प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका रीता देशमुख मॅडम, शाळेचे समन्वयक, वर्ग १ ते ८ चे सर्व पी.टी.ए.मेंबर्स आणि ॲबॅकस व वैदिक मॅथ्स शिक्षिका जिज्ञासा चक्करवार मॅडम व परीवार उपस्थित होते.

नृत्य कोरिओग्राफर कुणाल सर यांनी सर्व वर्गांचे नृत्य बसविले यात शाळेच्या शिक्षिका ज्योती खिरेकर, जान्हवी इंगोले, अर्चना पांडे, शुभांगी पाटील, वैशाली गायकवाड यांचे त्यांना विशेष योगदान लाभले. शाळेचे शिक्षक मनोज चावरे सरांनी नाटक स्क्रिप्ट स्वतः लिहिली. पुजा कळसपुरकर, निर्मला कुलकर्णी यांचे मोलाचे सहकार्य यात होते. तर गणेश नृत्य सचीन राजूरकर नृत्य कोरिओग्राफर आणि शाळेच्या संस्कृत शिक्षिका विणा भोयर यांनी बसविले.

शाळेचे संगीत शिक्षक मयूर आखले व विशाल रामणगारीया यांचे प्रमुख मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले. तसेच संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाचे साहित्य मुलांना तयार करण्यात उमेश इंगोले सरांचे योगदान होते. तर मागील पडद्यावर एल.इ.डी द्वारे चित्रफीत दाखविण्यात अंकूर कैपिल्यवार यांचे मोलाचे सहकार्य सर्वांना लाभले.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शिल्पा जाजू मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शाळेचे उपमुख्याध्यापक अश्विन जगताप, समन्वयक साबेरा बाटावाला आणि प्रशासकीय अधिकारी अंकुश पाटील सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

उपस्थित सर्व पालकांनी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे कौतुक केले व पुढेही असेच यशस्वी कार्य शाळेमार्फत होत राहावे अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदिता मेहता, टिशा जयपुरिया, मैत्रेयी सिंग, अर्णव जिरापूरे, अनाया जाजू यांनी वैशाली गायकवाड व मनोज चावरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली केले. आभार प्रदर्शन वर्ग ८ वीची विद्यार्थिनी आस्था जाजू हिने केले. शेवटी दिव्यांच्या लखलखाटात "एक विश्व एक स्वप्न" ही संकल्पना साकार झाली.

सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रमुख उपस्थिती व योगदान या कार्यक्रमात होते.


Updated : 25 Jan 2023 8:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top