विविध मागण्यासाठी दिव्यांग जिल्हा कचेरीवर
मागण्या मान्य न झाल्यास 26 जानेवारी पाासून अन्नत्याग आंदोलन : जय गुरुदेव युवा दिव्यांग संघटनेचा इशारा
X
यवतमाळ: शारीरिक दृष्ट्या अक्षम असणाऱ्या कुठलेही शारीरिक काम करता येत नाही त्यामुळे त्यांना शासनाकडून अर्थसहाय्य दिले जाते यवतमाळ नगर परिषदेच्या वतीने शहरातील दिव्यांग बांधवांना महिन्याचे पाचशे असे वर्षाकाठी सहा हजार रुपये अर्थसहाय्य दिले जात होते. परंतु आता तीनच हजार रुपये अर्थसहाय्य दिले जात असल्याने नगरपरिषद एक प्रकारे दिव्यांगा बांधवांच्या मुळावर असल्याचा आरोप करीत जय गुरुदेव युवा दिव्यांग संघटनेने करीत आज जिल्हा कचेरीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना एक निवेेदन देण्यात आले. मागण्यावर सकारात्मक विचार न झाल्यास 25 जानेवारी पासून आझाद मैदान येथे जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधव अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करेल.
शहरात दिवंगत बांधवांची संख्या मोठी आहे यातील बहुसंख्य दिव्यांग बांधवांना शारीरिक कष्टाची कामे जमत नाही त्यामुळे त्यांना आपला उदरनिर्वाह करणे कठीण जाते त्यांचीही तगमग बघता त्यांना नगरपरिषदेकडून वर्षाकाठी सहा हजार रुपये अर्थसहाय्य मिळत होते परंतु ते आता तीन हजार रुपये मिळत असल्याचे निवेदनातून सांगण्यात आले आहे. तसेच दिव्यांगाना ज्या ट्रायसायकल वाटप करण्यात आल्या आहे त्या निकृष्ठ दर्जाच्या असून त्या सर्व ट्रायसायकलीचा वाटप झाल्या तेव्हापासून भंगारमध्ये पडून आहे. त्या ट्रायसायकल वाटपाचा उच्चस्तरीय चौकशी करुन दिव्यांगांना चांगल्या स्थितीतील ट्रायसायकल देण्यात यावे. तसेच दिव्यांगाना रोजगारासाठी नगर परिषदेच्या वतीने 200 स्के.फुट जागा त्वरीत उपलब्ध करुन देण्यात यावी., दिव्यांगानी गेल्या तीन ते चार वर्षापासून नगर परिषद येथे धुळखात पडलेल्या आहे त्यावर त्वरीत निर्णय घ्यावा. तहसील कार्यालयात दिव्यांग बांधवांना अंत्योदय यादी समाविष्ठ करण्याकरीता सर्व कागदपत्रे देवून लाभ मिळत नाही. तसेच तहसील कार्यालयातून मिळणारे निराधारचे मानधन वेळेवर मिळत नाही. यवतमाळ जिल्हा परिषदेला शासनाकडून जो 5 टक्के निधी देण्यात येतो तोही यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा परिषदेकडून कुठेही खर्च करण्यात येत नाही असेही निवेदनात म्हटले अाहे. दि. 25 जानेवारीपासून येथील आझाद मैदान येथे जिल्ह्यातील संपूर्ण दिव्यांग अन्नत्याग आंदोलनाला बसणार असल्याचे जय गुरुदेव युवा दिव्यांग संघटना अध्यक्ष समाधान रंगारी, भाउराव वासनीक, स्वप्नील कोंकाडे, सचिन हातागडे, महेंद्र सावनकर, रामदास खोब्रागडे, सुहास कांबळे, रमेश मेश्राम यांच्यासह जिल्हयातील दिव्यांग हजर होते.