Home > News > बुलढाना येथे महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अधिवेशन - 26,27 जानेवारीला आयोजन, विविध प्रश्नांवर होणार चर्चा

बुलढाना येथे महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अधिवेशन - 26,27 जानेवारीला आयोजन, विविध प्रश्नांवर होणार चर्चा

Conference of Maharashtra State Newspaper Vendors Association held at Buldhana on January 26, 27, various issues will be discussed

बुलढाना येथे महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अधिवेशन    - 26,27 जानेवारीला आयोजन, विविध प्रश्नांवर होणार चर्चा
X

यवतमाळ: महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य अधिवेशन दि. 26 व 27 जानेवारी 2023 रोजी बुलढाना येथेील राधा गोविंद सेलिब्रेशन हॉल येथे होणार आहे. यावेळी आ.संजयभाऊ गायकवाड बुलढाना, राधेश्याम चांडक अध्यक्ष बुलढाना अर्बन क्रेडीट सोसायटी, खा.प्रतापराव जाधव, आ.सौ. श्वेताताई महाले, आ.राजेंद्र शिंगणे, आ.संजय कुटे, आ.आकाश पुंडकर, आ.संजय रायमुलकर, आ.राजेश एकडे, गजानन कोदूटवार जिल्हा माहिती अधिकारी आदि मान्यवर उपस्थित राहतील. यावेळी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सुनिल पाटणकर, सचिव विकास सुर्यवंशी, कार्याध्यक्ष बालाजी पवार, कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार व इतर पदाधिकारींच्या मार्गदर्शनात संपन्न होणार आहे. यावेळी वृत्तपत्र विक्रेतांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात येईल. वृत्तपत्र विक्रेत्याचे कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे, पेंशन, आरोग्य, शिक्षण आदि योजना ताबडतोब लाु करावे, वृत्तपत्र विक्रेत्याच्या असंघटीत कामगार म्हणून शासनाकडे नोंदी सुरू कराव्यात, शहरात मोक्याच्या ठिकाणी गटई कामगार प्रमाणे पेपर स्टॉल उपलब्ध करून द्यावे, शासकीय घरकुल योजनेत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी राखीव कोटा ठेवावा या व इतर मागण्यांवर शासनाचे लक्ष वेधण्यात येईल. तरी या अधिवेशनात यवतमाळ जिल्ह्यातून मोठ्या संख्येने वृत्तपत्र विक्रेता बांधवांनी हजर राहावे असे आवाहन म.रा.वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे उपाध्यक्ष संतोष शिरभाते, सदस्य किशोर भेदरकर, यवतमाळ जि.वृ.कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष अशोक शिंदे, सचिव किरण कोरडे, उपाध्यक्ष राजु हनवते, कोषाध्यक्ष श्रीराम खत्री, सुनिल बोरकर, रविंद्र चव्हाण, मदन केळापुरे, कमलनयन कोठारी, प्रविण आगलावे, तुषार गुज्जलवार व सर्व सदस्यांनी केले आहे, अशी माहिती प्रसिध्दी प्रमुख सचिन कदम यांनी दिली आहे.

Updated : 25 Jan 2023 12:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top