Home > News > भूमि अभिलेख कार्यालयातील धंदेवाईक कर्मचा-यांमुळे नागरीक हैरान

भूमि अभिलेख कार्यालयातील धंदेवाईक कर्मचा-यांमुळे नागरीक हैरान

दलाली बंद न झाल्यास अधिका-याची गाढवावर धिंड काढू- सिकंदर शहा

भूमि अभिलेख कार्यालयातील धंदेवाईक कर्मचा-यांमुळे नागरीक हैरान
X

प्रतिनिधी यवतमाळ

यवतमाळ येथील भूमि अभिलेख कार्यालय दलालांचा अड्डा बनले आहे. या ठिकाणी एकही काम पैसे न देता तसेच दलालाशिवाय होत नसल्यामुळे नागरीक हैरान झाले आहे. जिल्हाधिकारी यांनी भूमि अभिलेख कार्यालयातील दलाल राज न संपविल्यास भूमि अभिलेख कार्यालयातील अधिका-यांच्या तोंडाला काळे फासून गाढवावर धिंड काढण्याचा इशारा शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा यांनी दिला आहे.

शेत जमिनीशी संबंधीत सर्वच कामे भूमि अभिलेख कार्यालयामार्फत केली जातात. त्यामुळे गावातील तसेच ग्रामीन भागातील नागरीकांचा या कार्यालयाशी सतत संबंध येत असतो. मिळकत पत्रिका काढणे, पोट हिस्से पाडून देणे, फेरफार यासह विविध कामे या विभागामार्फत केली जातात, मात्र एकही काम दलालाशिवाय होत नसल्याच्या नागरीकांच्या तक्रारी आहे. विशेष म्हणजे प्रत्तेक कामासाठी शे-दोनशे पासून हजारो रुपये मागीतले जात आहे. मनुष्य बळ कमी असल्याची बतावणी करुन नागरीकांना काही दिवस ताटकळत ठेवले जाते त्यानंतर परीसरात सक्रीय दलाल अशा नागरीकांना हेरुन पैसे घेऊन त्यांचे काम करुन देत असल्याचे समोर आले आहे. या कार्यालयात दर दिवसाला लाखो रुपयांची अवैध उलाढाल होत आहे. यासंदर्भात वरीष्ठ अधिका-यांकडे तक्रारी केल्यानंतर कारवाई होत नसल्यामुळे अधिकारी सुध्दा या गैरप्रकारात सहभागी असल्याचा संशय निर्माण झाला आहे. कार्यालयात चकरा मारुन थकल्यानंतर नागरीकांना दलालाचा आधार घेतल्याशिवाय पर्याय राहत नाही. याबाबतच्या अनेक तक्रारी सिकंदर शहा यांचेकडे प्राप्त झाल्याने त्यांनी आता थेट शेतक-यांना सोबत घेऊन भूमि अभिलेख कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा तसेच संबंधीत अधिका-याची काळे फासून गाढवावर धिंड काढण्याचा इशारा दिला आहे.

जिल्हाधिका-यांनी दखल घ्यावी

यवतमाळचे भूमि अभिलेख कार्यालय गेल्या अनेक वर्षापासून पैसे खान्यासाठी बदनाम आहे. याआधी तर मोठया प्रमाणात तक्रारी वाढल्यामुळे तत्कालीन जिल्हाधिका-यांनी या कार्यालयात धाड मारली होती. आता पुन्हा प्रत्तेक कामासाठी लुटमारी केली जात आहे. काही कामासाठी तर एक ते दोन लाख रुपये येथील अधिकारी मागत आहे. जिल्हाधिका-यांनी दखल घेऊन कारवाई करावी अन्यथा भ्रष्ट अधिका-यांना गधेघाट दाखविल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सिकंदर शहा यांनी दिला आहे.


Updated : 25 Jan 2023 6:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top