Home > News > ग्रंथपाल परीक्षेत बुशरा आरिफ महाराष्ट्रात प्रथम

ग्रंथपाल परीक्षेत बुशरा आरिफ महाराष्ट्रात प्रथम

Bushra Arif first in Maharashtra in librarian exam

ग्रंथपाल परीक्षेत बुशरा आरिफ महाराष्ट्रात प्रथम
X

जनसंग्राम बाभुळगाव : ग्रथपाल परीक्षेचा निकालात बाभुळगाव येथील रहिवाशी बुशरा आरिफ अली हिने महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावला.

त्यामुळे तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. ग्रंथापालाची ही परीक्षा महाराष्ट्र राज्य ग्रंथालय व संचालनालय मुंबई यांनी घेतली आहे.

बाभूळगाव येथे आयोजित यवतमाळ जिल्हा ग्रंथालयाच्या 40 व्या अधिवेशनाप्रसंगी बुशरानाज आरिफ अली हिचा महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी यवतमाळ जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मनोज रणखांब, अमरावती विभागीय अध्यक्ष श्याम वाहूरवाघ, अ‍ॅड. निखिल सायरे, कार्यवाहक श्रीराम देशपांडे, अरविंद ढोणे, राजेंद्र कोरे, प्रशांत पंचभाई, अजय शिरसाट, पद्माकर राऊत, आनंद आडे, प्रल्हाद इंगळे, राम राऊत व मोठ्या संख्येने वार्षिक अधिवेशनाकरिता जिल्ह्यातून आलेले शासनमान्य अनुदानित ग्रंथालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते. संचालन भूषण ब्राह्मणे यांनी केले.

Updated : 25 Nov 2022 4:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top