Home > News > विविध संघटनांच्या वतीने प्रिया शिंदे यांचा वाढदिवस साजरा

विविध संघटनांच्या वतीने प्रिया शिंदे यांचा वाढदिवस साजरा

Birthday celebration of Priya Shinde on behalf of various organizations

विविध संघटनांच्या वतीने प्रिया शिंदे यांचा वाढदिवस साजरा
X

आर्णी

सामाजिक उपक्रमासह विविध संघटना गृपच्या वतीने विविध ठिकाणी दिवसभर डझनभर केक कापून प्रिया शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या हर्ष उल्हासात साजरा करण्यात आला. १९ नोव्हेंबर ला प्रिया शिंदे यांचा वाढदिवस, या निमित्य त्यांनी सकाळी ७ वाजता येथील महादेव मंदिर येथे अभिषेक केला. सकाळी ११ वाजता उमरी लगत वृद्धाश्रम येथे जावून त्यांनी स्वताच्या हाताने सर्व वृद्धांना मायेचा घास भरविला. दुपारी ०१ वाजता ठाकरे मोबाईल ग्यालरीच्या अगदी समोर सुरू असलेल्या भागवत सप्ताहात मुक्ताश्री दीदी पंढरपूरकर यांच्या हस्ते प्रियाताई शिंदे यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे सकाळी ११ वाजेपासून तर रात्री ९ वाजे दरम्यान नगर सुधार समितीच्या वतीने रशीद मलनस यांच्या दुकानामध्ये, अंजली ड्रेसेसमध्ये, जब्बार हॉटेल समोर, सोमनाथ टी सेंटरच्या वतीने, दुर्गामाता मंदिर जुनी वस्ती येथे, मोमीनपुरा येथे, अमराई पुरा येथे, साई कॉमलेक्स मध्ये, संजय गावंडे मित्र परिवाराच्या वतीने तसेच कोळवण येथे बिरसा ब्रिगेडच्या वतीने अनुक्रमे डझनभर केक कापून प्रियाताई शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी ठिकठिकाणी अनेकजण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Updated : 25 Nov 2022 5:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top