सर्वांना सेवानिवृत्ती वेतनाच्या जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संघटित व्हा.आणि संघर्ष करा.-शाहू भगत
कारंजा येथे राज्यकर्मचारी यांची लहान मुले आंदोलनात सहभागी.
X
कारंजा - दिनांक १४ मार्च पासुन मध्यवर्ती शासकीय व निमशासकीय कर्मचारी,समन्वय समिती आणि विविध संघटनानी पुकारलेल्या बेमुदत संपात राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचारी व विविध संघटनेचे, विविध विभागाचे कर्मचारी सहाव्या दिवशी कारंजा तहसील कार्यालय परिसर येथे जुन्या पेंशनच्या मागणी करीता उपस्थित होते.जुन्या पेंशनच्या मागणीसाठी संघटित व्हा आणि संघर्ष करा असे प्रतिपादन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
बेमुदत संपाच्या सहाव्या दिवशीच्या संपाच्या सुरुवातीला संपात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लहान मुलं-मुली उपस्थित होते. राहुल पापडे हे कर्मचारी आपल्या दोन महिन्याच्या लहान मुलाला घेऊन पत्नीसह उपस्थित होते.त्या सर्व मुला मुलांनी एकच मिशन जुनी पेन्शन,मागणारा कोण आहे?शेतकऱ्याचा पोर आहे.अशा प्रकारच्या घोषणा देऊन उपस्थिताचे मनोबल वाढवले. यानंतर उपस्थिता मधील वनविभागाचे विशाल हलगे,ग्रामसेवक गजानन उपाध्ये,सेवानिवृत्त शिक्षक अनंत सुपणर,शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय कारंजाचे प्राध्यापक डॉ.अशोक जाधव,कारंजा तालुका कृषी अधिकारी संतोष चौधरी, धामणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अनिरुद्ध डेरे, शिक्षक दिनेश पळसकर,भाग्यश्री तोडकर निलेश मोरे,बिरसा क्रांती दलाचे राजेश मस्के, सामाजिक समता प्रबोधन मंच चे हंसराज शेंडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
ज्ञानप्रकाश महाविद्यालय पिंजरचे प्राध्यापक रामेश्वर भगत व अनिरुद्ध डेरे यांनी कविता सादर केली, त्यानंतर वाट बघतोय पेन्शन वाला हे पेंशनगीत निशा खुमकर आणि त्यांच्या चमुनी सादर केले. गाव गाड्या वरील बायकांची पेन्शन वरती चर्चा ही नाटिका हर्षा गजभिये, वैशाली राऊत,माधुरी गावंडे,सोनल काकड, माधुरी बिजवार,कल्पना राऊत आदी कर्मचाऱ्यांनी सादर केली. यामुळे उपस्थित कर्मचाऱ्याचा उत्साह वाढला.
कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपला दिवसेंदिवस विविध सामाजिक संघटनेचा पाठिंबा मिळत आहे.आज मराठा सेवा संघ,समाज क्रांती आघाडी व सामाजिक समता प्रबोधन मंच या सामाजिक संघटनेने लेखी पाठिंबा दिला, त्यावेळी राजेंद्र मोडक, गोपाल लुंगे, अनिल मोरे,प्रवीण कानकिरड ,बंडूभाऊ पिंपळशेंडे,प्रशांत ठाकरे, विनायक पदमगिरीवार,रमेश नाखले आदी मान्यवर उपस्थित होते.
आजच्या संपाचं वैशिष्ट्य म्हणजे संपकऱ्याना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत हे उपस्थित होते ते मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की आपण यशाजवळ आलो आहे?सर्व संघटित रहा व संघर्ष करा.आपल्या प्रयत्नाला नक्की यश मिळेल.
अनेक पत्रकार बांधवांनी राज्यकर्मचारी यांच्या जुन्या पेन्शनच्या मागणीला आपले समर्थन जाहिर करून, सदर संपाला भेटी दिल्या. असे वृत्त मुख्याध्यापक विजय भड यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवीले आहे.