Home > News > गटविकास अधिकारी नेर यांनी दिले लेखी आश्‍वासनानंतर आजंतीचे फासे पारधी समाजाचे आंदोलन स्थगिती

गटविकास अधिकारी नेर यांनी दिले लेखी आश्‍वासनानंतर आजंतीचे फासे पारधी समाजाचे आंदोलन स्थगिती

After the written assurance given by group development officer Ner, the agitation of Ajanti's Fase Pardhi community was suspended

गटविकास अधिकारी नेर यांनी दिले लेखी आश्‍वासनानंतर आजंतीचे फासे पारधी समाजाचे आंदोलन स्थगिती
X

यवतमाळ: जिल्ह्यातील नेर तालुक्यातील आजंती येथील फासे पारधी समाज हा गेल्या अनेक वर्षापासून पालन टाकून आपला उदरनिर्वाह करीत आहे. परंतु प्रशासनाच्या व गावाच्या राजकारणामुळे या फासे पारधी समाजाला आजपर्यंत जीवनाश्‍यक सुविधापासून वंचित ठेवण्यात आले आहे. येत्या 26 जानेवारी रोजी सामुहीक आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यापुर्वी दि. 24 जानेवारी रोजी नेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी गुरुदेव युवा संघाच्या शिष्टमंडळाला बैठकीसाठी बोलाविले होते. त्यानंतर त्यांनी दि.23 जानेवारी रोजी दूपारी 12 वाजता ग्रा.पं. कार्यालय आजंती येथे मासिक सभेचे आयोजन केले असता कोरम अभावी सभा दि. 30 जानेवारी 2023 रोजी पुन्हा आयोजित केली आहे. तसेच दि. 2 फेब्रुवारी रोजी जागेचा ठरावासाठी ग्रामपंचायत आंजती येथे सभेचे आयोजन करण्याचे लेखी आश्‍वासन दिले. तसेच गटविकास अधिकारी यांनी गुरुदेव युवा संघाच्या शिष्टमंडळाला सांगीतले की, 2 तारखेची सभा जर कोरम अभावी झाली नाही तर ग्राम पंचायतला 149 ची नोटीस देवून ग्रामपंचायतची बॉडी बरखास्त करण्याची नोटीस बजावण्याचे आश्‍वासन यावेळी गुरुदेव युवा संघाला देण्यात आले. त्यानंतर गुुरुदेव युवा संघाच्या वतीने 26 जानेवारी रोजी होणार आत्मदहन आंदोलन मागे घेण्याचे आश्‍वासन गटविकास अधिकारी नेर यांना देण्यात आले. यावेळी गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम, बबन पवार, खजीरा घोसले, सुरज पवार, मनिष राठोड, नापेशा घोसले, सरला पवार, खडेशा पवार, जोशीला राठोड, छणेसा पवार, जितेना पवार, तेजस्वीनी पवार, फिरकाकडा पवार, कापेशा घोसले, इनेशा पवार, छेदर पवार, कैशेरा पवार, यासीरा पवार, हासमिरा पवार, जितेशा पवार, लतेशा पवार, सबेरा पवार, ईबेशा पवार, सूइचरणा पवार, रुषाली पवार, सुरजना पवार, सुवर्णा पवार, इंकीलास घोसले, साजेरी किसन पवार यांच्यासह आजंती गावातील फासे पारधी समाज बांधव यावेळी उपस्थित होते.

30 जानेवारीपर्यंत विद्युत मिटर तसेच पाण्याच्या पाण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र व 2 फेब्रुवारी रोजी जागेचा ठराव न मिळाल्यास पंचायत समिती नेर येथे तिव्र आंदोलन करण्याचा इशारा गुरुदेव युवा संघाच्या वतीने तसेच आजंती येथील फासे पारध्यांनी यावेळी दिला.

Updated : 25 Jan 2023 10:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top