Home > News > भरधाव दुचाकी ट्रकवर आदळली, दुचाकी चालक जागीच ठार

भरधाव दुचाकी ट्रकवर आदळली, दुचाकी चालक जागीच ठार

वरोरा मार्गावर घडली घटना

भरधाव दुचाकी ट्रकवर आदळली, दुचाकी चालक जागीच ठार
X

वरोरा तालुक्यातील नागलोन येथे वास्तव्यास असलेला 32 वर्षीय तरुण आपल्या दुचाकीने गावी परतत असताना ट्रकला धडकला. या भीषण अपघातात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि. 24 नोव्हेंबरला सायंकाळी 6:15 वाजता वरोरा मार्गावरील टर्निंग पॉईंट च्या जवळ घडली.राहुल ढवस असे मृतकाचे नाव आहे...

वरोरा मार्गाचे नव्याने बांधकाम होत आहे, एकेरी मार्गावरून वाहतूक होत असल्याने अपघाताची श्रृंखला वाढली आहे. मागील काही दिवसांपासून अपघातात वाढ झाली असून दुचाकीस्वार दगवल्याच्या घटना घडल्या आहेत. गुरुवारी सायंकाळी भरधाव दुचाकीस्वार ट्रकवर मागाहून आदळला यात त्याचा मृत्यू झाला आहे.वरोरा तालुक्यातील नागलोन या गावात वास्तव्यास असलेला मृतक तरुण असल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे. तो आपल्या दुचाकी क्रमांक MH- 34- AY-8024 ने गावी परत जात असताना समोर जाणाऱ्या ट्रक क्रमांक MH-34- BZ-4309 वर मागून आदळला.या अपघातात दुचाकीस्वाराला मोठ्या प्रमाणात मार लागला तसेच अति रक्तस्त्राव झाला. घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शीनी पोलिसांना दिली असून पुढील तपास सुरु आहे.

Updated : 25 Nov 2022 4:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top