Home > News update > शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड यांना थेट औरंगाबाद येथुन धमकी ; सीडी प्रकरणातून एका समर्थकाचा जलपळाट

शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड यांना थेट औरंगाबाद येथुन धमकी ; सीडी प्रकरणातून एका समर्थकाचा जलपळाट

Shiv Sena district chief Rajendra Gaikwad directly threatened from Aurangabad; The flood of a supporter from the CD case

यवतमाळ : ब्रेकिंग

शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड यांना थेट औरंगाबाद येथुन धमकी ; सीडी प्रकरणातून एका समर्थकाचा जलपळाट

यवतमाळ : शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय राठोड यांची एका वादग्रस्त प्रकरणाची सीडी आपल्याकडे आहे, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. याच सीडी प्रकरणामुळे एका आमदार राठोड यांच्या समर्थकाचा जळपळाट झाला आहे. सतीश नाईक असे राठोड समर्थकाचे नाव आहे. त्याने थेट औरंगाबाद येथून सेना जिल्हा प्रमुख गायकवाड यांना फोन करून धमकी दिली. आमदार संजय राठोड हे शिवसेनेच्या नाही तर बंजारा समाजाच्या मतांमुळे निवडून येत असल्याचा दावा या समर्थकाने केला आहे. त्यालाही गायकवाड यांनी कडक शब्दात उत्तर देत यवतमाळ येथे चर्चेसाठी येण्याचे आव्हान दिले आहे. या संदर्भात झालेल्या संभाषणाची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे.

Updated : 2022-06-30T07:00:44+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top